Latest

T20 World Cup 2022 : जोस बटलरचा ‘प्लेयर ऑफ दि टुर्नामेंट’ सूर्यकुमार तर बाबर आझमने दिले ‘या’ खेळाडूला मत

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा विश्वचषक स्‍पर्धेतील प्रवास सेमीफायनलमध्ये संपला. टीम इंडियाला इंग्लंडने १० गडी राखून पराभूत केले.  या विश्वचषकात भारतीय फलंदाजी सूर्यकुमार यादवने दमदार कामगिरी केली. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने सूर्यकुमार यादवला 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' म्हणून निवडले आहे. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने बटरलच्या या मताशी असहमती दर्शवली आहे. (T20 World Cup 2022)

बटलरकडून सूर्यकुमारचे कौतुक

यंदाच्‍या विश्वचषक स्‍पर्धेत सूर्यकुमार यादव कोणत्याही दबावाखाली खेळला नाही. त्याने मुक्तपणे आपला खेळ दाखवला, असे मत जोस बटलर याने व्यक्त केले आहे. सूत्रसंचालक आणि जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने जोस बटलरशी संवाद साधला यावेळी तो बोलत होता. बटलर म्हणाला, भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत. मात्र, सूर्यकुमारने टीम इंडियात स्वत:ची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य होते. सूर्यकुमार यादवने या टी-२० विश्वचषकात १८९.६८ च्या स्ट्राईक रेट २३९ धावा केल्या. २३९ धावांसह विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. (T20 World Cup 2022)

शादाब खान 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट'चा दावेदार : बाबर (T20 World Cup 2022)

जोस बटलरने प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून सूर्यकुमार यादवला निवडले. यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने त्याचा 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' शादाब खान असल्याचे म्हटले आहे. बाबर आझम म्हणाला, शादाबने गोलंदाजी करताना भेदक मारा केला. त्याच्या फलंदाजीमध्येही सुधारणा झाली आहे. गेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने दमदार कामगिरी केली. त्यामुळे माझ्यासाठी 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' शादाब खान आहे. (T20 World Cup 2022)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT