Latest

Suryakumar T20 WC : पाकिस्‍तानचे माजी गोलंदाज झाले सूर्यकुमारचे फॅन; म्हणाले, “हा दुसऱ्या ग्रहावरून…”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टीम इंडियाचा स्‍टार फ्‍लेअर आणि टी-२० मधील जगातील अव्‍वल फलंदाज सूर्यकुमारचे जगभरात चाहते आहेत. यंदाच्‍या टी -२० विश्‍वचषक स्‍पर्धेत सूर्यकुमार केलेल्‍या कामगिरीमुळे चाहते त्‍याला 'मिस्टर 360' असे संबोधित आहेत. ( Suryakumar T20 WC )सूर्यकुमारच्‍या आधी दक्षिण आफ्रीका संघातील एबी डिविलियर्स याला ही उपाधी बहाल करण्‍यात आली होती.

झिम्‍बाब्‍वे विरुद्ध सामन्‍यात सूर्यकुमारने २५ चेंडूत ६१ धावा केल्‍या. त्‍याने सहा चोकार आणि चार षटकार फटकावले.
त्‍याच्‍या या खेळीने आता पाकिस्‍तानचे माजी वेगवान गाोलंदाज वसीम अक्रम आणि वकार यूनुस हेही त्‍याचे फॅन झाले असून त्‍यांनी सूर्यकुमारवर स्‍तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे.

Suryakumar T20 WC :  सूर्यकुमार दुसर्‍या ग्रहावरुन आला असावा : अक्रम

वसीम अक्रम म्‍हणाले की, मला वाटतं सूर्यकुमार हा दुसर्‍या ग्रहावरुन आला असावा. तो अन्‍य फलंदाजांपेक्षा खूपच वेगळला आहे. त्‍याला फलंदाजी करताना पाहणे हा एक आनंददायी अनुभव असतो. तो जगातील सर्वचे वेगवान गोलंदाजांसमोर तो निर्भयपण खेळतो.
वकार यूनुस म्‍हणाले, सूर्यकुमारला गाोलंदाजी करताना तुम्‍ही प्लॅनिंग करु शकत नाही. त्‍याला वन डे आणि कसोटीमध्‍ये तुम्‍ही अआउट करु शकता. मात्र टी-20 खेळात गाोलंदाज हे बॅकफूटवर असतात, सूर्यकुमारसारख्‍या फॅार्ममध्‍ये असलेल्‍या खेळाडूला गाोलंदाजी करणे अवघड होते. त्‍यामुळे पाकिस्‍तानला त्‍याच्‍या विरुद्ध चांगलीच गाोलंदाजी करावी लागले.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT