Latest

Syed Mushtaq Ali Trophy : अंबाती रायडूची जुनी खोड कायम; मैदानात पंचांशी घातली हुज्जत

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२२ च्या सौराष्ट्र विरूद्ध बडौदा यांच्या सामन्यादरम्यान अंबाती रायडूने पुन्हा एकदा जुनी खोड दाखवली आहे. बुधवारी (दि. १२) सौराष्ट्र वि. बडौदा सामन्यात रायडू आणि शेल्डन जॅक्सन यांच्या दरम्यान मैदानावर वाद झाला. यानंतर पंचांना आणि इतर खेळाडूंना मध्यस्थी करून हा वाद थांबवावा लागला. रायडू आणि जॅक्सन यांच्या या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Syed Mushtaq Ali Trophy)

डी ग्रुपमधील बडोदा वि. सौराष्ट्र दरम्यानच्या सामन्यात ही अनपेक्षित घटना घडली. यानंतर रायडू आणि शेल्डन यांच्यामध्ये कोणत्या कारणामुळे वाद झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र ते एकमेकांकडे रागात धावले.  बडोदा संघाचा कर्णधार रायडूने जॅक्सनला असे काही म्हटले की, यष्टीरक्षक फलंदाज नाराज झाला. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओत पंच आणि इतर खेळाडू अंबाती रायडू आणि जॅक्सन यांच्या वादाला थांबवण्यासाठी पुढे आलेले दिसत आहे. (Syed Mushtaq Ali Trophy)

या सामन्यात सौराष्ट्रने बडौदावर दिमाखदार विजय मिळवला. बडौद्याच्या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना १७५ धावा केल्या. आणि सौराष्ट्र समोर १७६ धावांचे आव्हाने ठेवले. मितेश पटेलने ३५ चेंडूमध्ये ६० धावांची दमदार खेळीने बडौदाला १७५ धावांपर्यंत पोहचवले.
बडौद्याच्या १७६ धावांच्या आव्हानाचा सामना करताना समर्थ व्यासने दमदार कामगिरी केली. त्याने ५२ चेंडूमध्ये ९७ धावा केल्या. पण तो शतक पूर्ण करू शकला नाही. पण त्याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर सौराष्ट्रला विजय मिळवता आला. समर्थ व्यास शिवाय इतर कोणीही २० धावांपेक्षा मोठी धावसंख्या उभी करू शकले नाही. (Syed Mushtaq Ali Trophy)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT