Latest

Sweden’s research rocket : स्वीडनचे संशोधन रॉकेट कोसळले नॉर्वेच्या हद्दीत

अमृता चौगुले

स्टॉकहोम; वृत्तसंस्था : स्वीडन स्पेस कॉर्पोरेशनने उत्तर स्वीडनमधील स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केलेले संशोधन रॉकेट अचानक खराब झाले आणि लगतच्या नॉर्वेत कोसळले. (Sweden's research rocket)

रॉकेट 1 हजार मीटर उंचीवरून 15 कि.मी. अंतरावरील नॉर्वेच्या सीमेतील पर्वतांमध्ये कोसळले. या दुर्घटनेमागचे तांत्रिक कारण काय, ते शोधले जात आहे. आता रॉकेटचे अवशेष मिळवायचे तर स्वीडनला नॉर्वेची परवानगी अपेक्षित असेल. (Sweden's research rocket)

दुसरीकडे नॉर्वेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घटना गंभीर असल्याचे म्हटले असून स्वीडनने या घटनेची औपचारिक माहिती देण्याचे सौजन्यही दाखविलेले नाही, अशी टीका केली आहे.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT