Latest

Swara Bhaskar : स्वरा भास्कर आई झाली? सोशल मीडियावर ट्रेंड; सत्य काय?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री स्वरा भास्कर हिने बाळाला जन्म दिल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Swara Bhaskar ) अभिनेत्री स्वराच्या लग्नाला साडे चार महिने पूर्ण झाले आणि तिने बाळाला जन्म दिलाय. अशी माहिती ट्विटरवर व्हायरल होत आहे. तसेच ट्विटरवर व्हायरल झालेल्या काही ट्विटमध्ये असेही म्हटले जात आहे की-" स्वरा भास्करच्या पतीने तिच्या प्रेग्नेन्सीच्या वृत्ताला कन्फर्म केलं आहे. ती जुलै महिन्यात बाळाला जन्म देऊ शकेल". (Swara Bhaskar ) अद्याप या माहितीबाबत स्वरा भास्कर किंवा फहदकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. (Swara Bhaskar)

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात समाजवादी पार्टीचे यूथ विंगचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष फहद अहमदशी लग्न केले होते. आधी दोघांनी कोर्ट मॅरेज आणि नंतर दिल्लीत पारंपरिक पद्धतीने लग्न केले होते.

दरम्यान, स्वरा भास्करने रेसलर प्रोटेस्टला समर्थन केले आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकार आणि खेळाडूंनी रेसलर प्रोटेस्टला पाठिंबा दिलाय. बृजभूषण शण सिंह यांच्याविरोधात साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यासारख्या खेळाडूंनी आंदोलन केले आहे.

स्वरा भास्करने व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, देशात रेसलर मागी काही दिवसांपासून बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्लीमध्ये जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहेत. आमच्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना लैंगिक छळाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पाडले जाते हे लाजिरवाणे आहे…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT