Latest

Rajiv Mishra : माजी हॉकीपटू राजीव मिश्रा यांचा संशयास्पद मृत्यू

Shambhuraj Pachindre

वाराणसी; वृत्तसंस्था : टीम इंडियाचे माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू राजीव मिश्रा यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. वाराणसीतील नारायणपूर येथील त्यांच्या घरी अत्यंत खराब अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. (Rajiv Mishra)

मिल्टन (इंग्लंड) येथे 1997 मध्ये झालेल्या ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेतील भारताचा आघाडीचा स्ट्रायकर राजीव मिश्रा यांचा वयाच्या 46 व्या वर्षी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजार्‍यांनी पोलिसांना दिली. शिवपूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घरात जाऊन पाहिले असता राजीव मिश्रा यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. राजीवने 1997 च्या ज्युनियर वर्ल्डकपमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. (Rajiv Mishra)

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT