पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील संदेशखाली अत्याचार प्रकरणी अटकेत असणारा तृणमूल काँग्रेसचा निलंबित नेता शहाजहान शेख याला पश्चिम बंगालमधील बशीरहाट न्यायालयात हजर केले. यावेळी आपल्या मुलीला पाहताच शहाजहान शेख याच्या अश्रुचा बांध फुटला. त्याच्या रडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांच्यासह शहाजहान याची खिल्ली उडवली आहे.
सीबीआयने शहाजहानला बशीरहाट स्थानिक न्यायालयात हजर केले होते. कोर्टातून बाहेर पडताना त्यांनी आपल्या मुलीला पाहिले. यावेळी त्याला अश्रू अनावर झाले. या घटनेच्या व्हिडिओमध्ये शाहजहान पोलिस व्हॅनमध्ये बसलेला आणि आपल्या मुलीशी संवाद साधल्यानंतर स्वत:चे अश्रू पुसताना दिसत आहे.
शाहजहानच्या रडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी टीएमसीच्या माजी नेत्याची खिल्ली उडवली आहे. त्यांनी सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म Xवर पोस्ट केली आहे की, "ममता बॅनर्जीचा पोस्टर बॉय – बलात्कारी शेख शहाजहान एखाद्या असह्य मुलासारखा रडत आहे. हा गुन्हेगार अनुतो मंडल तुरुंगात आहे. हेच त्याचे नशीब आहे. ममता बॅनर्जी त्यांच्या मंत्र्यांना वाचवू शकल्या नाहीत."
प. बंगालमधील संदेशखाली येथील अनेक महिलांनी शहाजहान याच्यावर लैंगिक हिंसाचार आणि जमीन बळकावल्याचा आरोप केला आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित एका प्रकरणात त्यांच्यावर वाँरट बजावले होते. यानंतर ५५ दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर 29 फेब्रुवारी रोजी त्याला अटक करण्यात होती. कोलकाता उच्च न्यायालयाने "त्याला अटक केली पाहिजे" असे सांगून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर कारवाई करण्यात विलंब केल्याबद्दल राज्य पोलिसांना फटकारले हेते. यानंतर तीन दिवसांनी त्याला अटक झाली होती. त्याच्या अटकेनंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी त्याचा ताबा सीबीआयकडे वर्ग केला होता.
हेही वाचा :