Latest

सुशांतच्या बहिणीने Rhea Chakraborty ला वापरले अपशब्द? ‘रोडीज’ प्रोमोनंतरचे ‘ते’ ट्विट व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात वादळ आलं. रियाने एमटीव्हीपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आता ती 'रोडीज सीजन-१९' मध्ये परीक्षक बनून पुन्हा नवी इनिंग सुरू करत आहे. शोमध्ये (Rhea Chakraborty ) रिया चक्रवर्तीच्या एंट्रीचा प्रोमो जारी झाला आहे. पण, यादरम्यान, सुशांत सिंह राजपूतची बहिण प्रियंका सिंहने एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये तिने कुणाचेही नाव घेतले नाही. पण तिचे ट्विट पाहून लोकांना असं वाटत आहे की, हे ट्विट रिया चक्रवर्तीसाठी आहे. प्रियंका सिंहच्या या ट्विटमध्ये अपशब्द वापरण्यात आले आहेत. (Rhea Chakraborty )

रोडीज १९ प्रोमोवेळी रिया चक्रवर्ती म्हणते, 'तुम्हाला काय वाटलं, मी परत येणार नाही, घाबरेन?' यानंतर तत्काळ प्रियंका सिंहने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हिंदीमध्ये लिहिलंय, 'तू का घाबरशील? तू तर ….. होतीस, आहेस आणि राहसील! प्रश्‍न हा आहे की तुझे उपभोक्‍ता कोण आहेत? कोणी सत्ताधारीच ही हिंमत देऊ शकतो.'

प्रियंका सिंहने या ट्विटच्या अंतमध्ये इंग्रजीत लिहिलं, 'Sushant Singh Rajput केसमध्ये होत असलेल्या वेळेला कोण जाबबादार आहे, हे स्‍पष्‍ट आहे.'

'रोडीज-१९' मध्ये गँग लीडर बनली रिया चक्रवर्ती

एमटीव्हीने रिया चक्रवर्तीला 'रोडीज-१९' मध्ये नवी गँग लीडर म्हणून सादर केले आहे. प्रोमो जारी करत कॅप्‍शनमध्ये लिहिले, 'सांभाळून राहा वा घाबरून?' व्हिडिओमध्ये रिया चक्रवर्ती म्हणते-'तुम्हाला काय वाटलं मी परत येणार नाही, घाबरेन. घाबरायची वेळ दुसऱ्याची आहे. भेटूया ऑडिशनला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT