पुढारी ऑनलाईन : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा आज वाढदिवस आहे. त्याचा जन्म २१ जानेवारी, १९८६ ला झाला होता. त्याच्या वाढदिवसादिवशी चाहतेही त्याची (Sushant Singh Rajput Birthday) आठवण काढत या अभिनेत्यावरचे प्रेम व्यक्त करत आहेत. सुशातची बहिण श्वेता सिंह-किर्ती हिने तिच्या इन्स्टाग्रामवरून फोटो शेअर करत, दिवंगत भाऊ अभिनेता सुशांतविषयी प्रेम व्यक्त करणारी पोस्ट केली आहे.
श्वेता सिंह हिने फोटोसोबत शेअर केलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या प्रेमळ, गोड भावा, तू जिथे असशील तिथे नेहमी आनंदी राहा. आम्ही तुझ्यावर अनंत आणि अनंताच्या ताकदीएवढे प्रेम करतो. कधी कधी तू खाली पृथ्वीवर देखील बघत जा की, तू किती जादू केली आहेस, तुझ्या सोन्यासारख्या हृदयाने अनेक सुशांतना जन्म दिले आहेत. माझ्या बाळाचा (Sushant Singh Rajput Birthday) मला अभिमान आहे आणि नेहमीच असणार आहे. #sushantday #sushantmoon' असेही तिने म्हटले आहे.
सुशांत सिंग राजपूत हा एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता होता. त्याने काई पो चे!, सोनचिरिया, छिछोरे, दिल बेचारा, एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी, ड्राईव्ह आणि बरेच काही सारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पवित्र रिश्ता या त्याच्या टीव्ही शोमुळे तो प्रत्येकाच्या घराघरात पोहोचला आणि अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाला.