Latest

Suryakumar Yadav : वर्कलोड कमी करण्यासाठी सूर्यकुमारला कसोटीतून विश्रांती

Shambhuraj Pachindre

मुंबई; वृत्तसंस्था : भारताचा स्टायलिश क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव याला वेस्ट इंडिज दौर्‍यात कसोटी संघात स्थान मिळालेले नाही, याचा अर्थ त्याची लाल चेंडूवरील कारकिर्द धोक्यात आहे, असे समजणे चुकीचे आहे. उलट त्याला आशिया चषक आणि वर्ल्डकपपूर्वी कमीत कमी वर्कलोड देऊन त्याला जपण्याचे काम बीसीसीआय करीत आहे, असे मत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने व्यक्त केले. (Suryakumar Yadav)

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने इनसाइड स्पोर्टस्ला सांगितले की, वेस्ट इंडिज दौर्‍यापेक्षा 2023च्या विश्वचषक त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे. खराब कामगिरीनंतरही सूर्यकुमारने वन-डे संघातील आपले स्थान कायम ठेवले आहे. 'मिस्टर 360'ने त्याची खेळी अशीच पुढे सुरू ठेवत टीम इंडियाला विजय मिळवून द्यावेत. त्याच्याकडून भारताला खूप अपेक्षा आहेत. सूर्याने टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष द्यावे. मात्र, सूर्या अद्याप कसोटी फॉरमॅटमधून बाहेर पडलेला नाही. (Suryakumar Yadav)

सूर्यकुमार चाणाक्ष

'द-स्काय' म्हणून चाहत्यांचा लाडका असणारा सूर्या हा एक अतिशय सक्षम आणि चाणाक्ष फलंदाज आहे. सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. मात्र, तो 32 वर्षांचा आहे आणि आपल्याला भविष्यासाठी संघाची योजना आखायची आहे. तो चेंडूचा क्लीन स्ट्रायकर आहे आणि धावांचा वेग सेट करू शकतो. तो आपली क्षमता सिद्ध करू शकला, तर ते भारतासाठी चांगले असेल.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT