Latest

Congress: सुप्रिया भारद्वाज काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय माध्यम समन्वयक

मोनिका क्षीरसागर
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: काँग्रेसने सुप्रिया भारद्वाज यांची राष्ट्रीय माध्यम समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी या पदावर राधिका खेडा कार्यरत होत्या. मात्र त्यांनी पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप करत आपल्या पदाचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसने (Congress) ही नियुक्ती केली आहे.
काही दिवसापूर्वी पर्यंत राधिका खेडा काँग्रेसच्या राष्ट्रीय माध्यम समन्वयक होत्या. मात्र, "प्रभू श्रीरामाचे अयोध्येत जाऊन दर्शन घेतल्यामुळे पक्षात आपल्याला योग्य वागणूक दिली जात नाही," यासह इतरही गंभीर आरोप राधिका खेडा यांनी केले होते. या आरोपांची आणि तक्रारींची दखल घेतली गेली नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या पदाचा आणि पक्षातील प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या एकूण प्रकारानंतर काँग्रेसने (Congress) दिल्लीतील वरीष्ठ पत्रकार सुप्रिया भारद्वाज यांची राष्ट्रीय माध्यम समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.

Congress: कोण आहेत सुप्रिया भारद्वाज?

सुप्रिया भारद्वाज दिल्ली स्थित वरीष्ठ पत्रकार आहेत. विविध प्रतिष्ठित माध्यम समूहांमध्ये त्यांनी काम केले आहे. जवळपास दीड दशकांहून अधिक काळ पत्रकारिता केल्यानंतर त्या राहुल गांधींच्या टीमचा भाग झाल्या. गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या (Congress) विविध गोष्टींमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग आहे. आता काँग्रेसने त्यांच्याकडे राष्ट्रीय माध्यम समन्वयक पदाची जबाबदारी दिली आहे.

हेही वाचा:
SCROLL FOR NEXT