नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांना सोमवारी (दि.२६) सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. त्यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिकाकर्ते ॲड. किशोर नाना शिंदे यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. मनसे नेते शिंदे यांनी २०१९ च्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातील निकालाला आव्हान दिले होते. या निवडणुकीत चंद्रकांत पाटील २५ हजारांहून अधिकच्या मताधिक्याने निवडून आले होते. तर, याचिकाकर्ते शिंदे यांना ७९ हजार ७५१ मते मिळाली होती.
निवडणुकीनंतर शिंदे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, २६ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेत मटेरियल फॅक्ट्स मेंशन केले नाहीत. या मुद्द्यावर निवडणुक याचिका रद्द केली होती. न्यायालयाच्या या आदेशाला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाला कायम राखत याचिका रद्द केली आहे.
हेही वाचलंत का ?