Latest

film The Kerala Story च्या प्रदर्शनास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा द केरळा स्टोरी चित्रपट रिलीज होण्याआधीच वादात सापडला आहे. सेन यांनीच या चित्रपटाची कहाणीदेखील लिहिलीय. सुदिप्तो सेन यांच्या या चित्रपटाची कहाणी ३२ हजार महिलांच्या धर्म परिवर्तनाची कहाणी आहे, जी राज्यातून गायब झाली होती आणि त्यांना आयएसआयएसमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. दरम्यान 'द केरळा स्टोरी चित्रपटात द्वेषपूर्ण विधाने आहेत.' त्यामुळे (film The Kerala Story) सर्वोच्च न्यायालयात या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. पण या चित्रपटाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. (film The Kerala Story)

'दि केरला स्टोरी' चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती दिली जावी, अशा विनंतीच्या याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा चित्रपट म्हणजे 'हेट स्पीच' चा प्रकार असून दृक-श्राव्य माध्यमातून केला जात असलेला चुकीचा प्रचार असल्याचे ऍड. कपिल सिब्बल आणि ऍड. निजाम पाशा यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना सांगितले.

येत्या शुक्रवारी 'दि केरला स्टोरी' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शि झाला असून दीड कोटीपेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला असल्याची माहिती पाशा यांनी न्यायमूर्ती के. एम. जोसेफ व न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठाला दिली. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेले आहे. अशावेळी आम्ही हस्तक्षेप करण्याचे काही कारण नाही. जर तुम्हाला काही आक्षेप असतील, तर प्रमाणपत्राला आव्हान द्या, असा सल्ला खंडपीठाने याचिकाकर्त्याला दिला.

केरळची प्रतिमा नकारात्मक दाखवण्याचा आरोप

'द केरळा स्टोरी' चा ट्रेलर आणि टीजर रिलीज झाल्यानंतर राजकीय घमासान झालं. काँग्रेस पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी यासारख्या पक्षांनी या चित्रपटाचा विरोध केला आहे. राजकीय पक्षांनी चित्रपटाच्या डिस्ट्रीब्यूशनवर आक्षेप घेतला. या पक्षाचं म्हणणं आहे की, या चित्रपटाच्या माध्यमातून केरळची प्रतिमा नकारात्मकपणे दाखवली जात आहे. आता साीपीआय-एम आणि इंडियन यूनियन मुस्लिम लीगने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केलीय.

दरम्यान, मुस्लिम यूथ लीगच्या केरळ राज्य समितीने चित्रपट 'द केरळ स्टोरी'मध्ये करण्यात आलेले 'आरोप' सिद्ध करून दाखवणाऱ्यास १कोटी रुपये देण्याची घोषणा केलीय.

SCROLL FOR NEXT