Latest

‘त्या’ याचिकेवर तत्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार

मोहन कारंडे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने २ हजारांच्या नोटा बॅंकेत जमा करतांना कुठल्याही ओळखपत्राची आवश्यकता नसल्याचे जाहीर केल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची विनंती याचिकाकर्ते, भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी केली होती. पंरतु, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा एकदा याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच लवकरच सुनावणी घेऊ असे खंडपीठाने स्पष्ट केले.

याचिकेवर यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ सुनावणीस नकार दिला होता, असे खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात न्यायालयाने याचिकेवर तत्काळ सुनावणी संदर्भात काय म्हंटले होते, याचा अहवाल न्यायालयाने रजिस्ट्रीकडून मागितला आहे. दरम्यान, शुक्रवारी याचिकाकर्ते पुन्हा एकदा तत्काळ सुनावणीची मागणी करू शकतील, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT