Latest

माफिया अतिक- अशरफ हत्येच्या चौकशीची मागणी, सुनावणीस सुप्रीम कोर्टाची सहमती

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : कुख्यात गुंड आणि माजी खासदार अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येची चौकशीच्या मागणी याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने ही याचिका २८ एप्रिल रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्याचे मान्य केले आहे.

माफिया अतिक आणि अशरफ हत्या प्रकरणी याचिकाकर्त्याने हत्येच्या चौकशीसाठी न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची मागणी याचिकेमधून केली आहे.

यावेळी स्पष्टीकरण देताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काही प्रकरणांमध्ये यापूर्वीच तारखा देण्यात आल्या आहेत. दरम्यान ५ न्यायमूर्ती हजर नसल्याने या प्रकरणांची सुनावणी बंद केली जाऊ शकत नाही. दरम्यान हे पाच न्यायमूर्ती कोविडने आजारी असून, त्यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे आम्ही पुढील उपलब्ध तारखेला संबंधित याचिका सूचीबद्ध करू, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले आहे.

२०१७ पासून आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या १८३ एनकाउंटरची चौकशी न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली तज्ञ समितीमार्फत करण्याची मागणी याचिककाकर्ते वकील विशाल तिवारी यांनी दाखल केली आहे. आज, सोमवारी (दि.२४) न्यायालय याचिकेवर सुनावणी घेणार होते. पंरतु, हे प्रकरण सुनावणीसाठी सुचीबद्ध करण्यात आले नाही. १५ एप्रिलला रात्री घडलेल्या या हत्याकांडाचा तपासासाठी उत्तर प्रदेश सरकारने तीन सदस्यीय न्यायिक तपास आयोग स्थापना केला आहे, हे विशेष.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT