Latest

Sunny Leone : सनी लिओनीचा इंफाळमध्ये फॅशन शो, त्याचठिकाणी झाला बॉम्बस्फोट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सनी लिओनीच्या मणिपूरमधील इंफाळ येथे फॅशन शो होणार होता, त्याठिकाणी बॉम्बस्फोट (Sunny Leone) झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सुदैवाने या स्फोटात कुणीही जखमी झाले नाही. शोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इंफाळमध्ये शनिवारी एका फॅशन शो कार्यक्रमाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. या कार्यक्रमात सनी लिओनी सहभागी होणार होती. कांगजीबंग परिसरात हा स्फोट झाला आहे. (Sunny Leone)

मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट कार्यक्रमाच्या स्थळापासून १०० मीटर दूर अंतरावर सकाळी साडे छहा वाजण्याच्या सुमारास झाला. आतापर्यंत कुठल्याही अतिरेकी संघटनेने स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही'

इंफाळच्या माजी एसपी महारबम प्रदीप सिंह यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'कुणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. आम्हाला संशय आहे की, हे चीनी ग्रेनेड सारखं स्फोटक उपकरण आहे, ज्यामुळे स्फोट झाला.

SCROLL FOR NEXT