Latest

IFFI2023 : चित्रपटांमध्ये समांतर-व्यावसायिक भेद नको : सनी देओल

स्वालिया न. शिकलगार

पणजी 

कोणताही चित्रपट हा मनोरंजनासाठी बनविला जातो. जो चित्रपट प्रेक्षकांना आवडतो, त्याला ते डोक्यावर घेतात. (IFFI2023) सर्व प्रकारच्या चित्रपटांना प्रेक्षक असतात. त्यामुळे समांतर आणि व्यावसायिक चित्रपट असा भेद असू नये, अशी प्रतिक्रिया अभिनेता सनी देओल यांनी दिली. (IFFI2023)

संबंधित बातम्या –

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सोमवारी थाटात प्रारंभ झाला. या महोत्सवात अभिनेता सनी देओल यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी सनी देओल म्हणाले, मी पहिल्यांदाच इफ्फीला आलो आहे. या महोत्सवात येऊन मला छान वाटत आहे. येथे विविध विषयांवर चित्रपट पाहता येणार आहेत. या चित्रपटांच्या सर्व टीमला मी ओळखतो. मीही त्यांच्यापैकीच एक आहे.

चित्रपट समांतर आणि व्यावसायिक या दोन प्रकारात विभागले जातात, याबद्दल काय वाटतं? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, चित्रपटांमध्ये असा कोणताही भेद असू नये. कारण प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी असतो. या दोन्ही प्रकारच्या चित्रपटांना प्रेक्षक असतोच. मग आपण यात भेद का करावा, असेही ते म्हणाले.

SCROLL FOR NEXT