Latest

Sunil Narine Retirement : वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनिल नरेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Arun Patil

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनिल नरेन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३५ वर्षीय सुनिल नरेन याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो जगभरातील फ्रेंचायझीकडून क्रिकेट खेळत राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तो आगामी आयपीएलमध्येही खेळताना दिसेल. (Sunil Narine Retirement)

निवृत्तीची घोषणा करताना नरेन म्हणाला, "मी वेस्ट इंडिजकडून शेवटचा सामना खेळून चार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण मी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा करत आहे. मी सार्वजनिकरित्या खूप कमी बोलतो. परंतु काही लोकांनी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला नेहमीच पाठिंबा दिला. वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे स्वप्न साकार करण्यास मदत केली. मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो." (Sunil Narine Retirement)

नरेन याने २०११ मध्ये वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो फक्त सहा कसोटी खेळला. नरेनने सहा कसोटीत २१ बळी घेतले. २०१२ मध्ये कसोटी पदार्पण केल्यानंतर त्याने २०१३ मध्ये या फॉरमॅटमध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्याने २०१२ मध्ये वेस्ट इंडिजला टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिवाय, नरेनने २०१२ च्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली होती. तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. त्याने कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून दिले होते.

नोव्हेंबर २०१५ मध्ये नरेनला त्याच्या बॉलिंग अॅक्शनमधील तृटींमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यापासून निलंबित करण्यात आले होते. एप्रिल २०१६ मध्ये त्याला पुन्हा गोलंदाजी करण्यास मंजुरी देण्यात आली, परंतु त्यानंतर तो वेस्ट इंडिजसाठी काही सामने खेळू शकला. ऑगस्ट २०१९ मध्ये तो वेस्ट इंडिजकडून शेवटचा टी-20 खेळला होता. (Sunil Narine Retirement)

आयपीएलमध्ये फॉर्म दाखवूनही आवश्यक फिटनेस मानकांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्याने नरेनची २०२१ टी-२० विश्वचषकासाठी निवड झाली नाही. त्याने २०११ मध्ये भारताविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. २०१२ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नरेनने ६५ एकदिवसीय सामन्यात ९२ आणि ५१ टी-20 सामन्यात ५२ विकेट घेतल्या आहेत. (Sunil Narine Retirement)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT