Latest

Sunil Gavaskar on Sarfaraz Khan : ‘त्या’ खराब शॉटवर सुनील गावस्करांनी सर्फराजला खडसावले

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनालाईन डेस्क : इंग्लंडविरुद्धच्या धर्मशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (दि.8) सर्फराज खानच्या शॉट सिलेक्शनवर भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर संतापले. धर्मशाला येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सर्फराज खानला मोठी खेळी करण्याची संधी होती. आक्रमक फटका मारताना तो बाद झाला त्याने पहिल्या डावात 60 बॉलमध्ये 56 धावा केल्या. यावेळी त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. (Sunil Gavaskar on Sarfaraz Khan)

सर्फराजवर का संतापले सुनील गावस्कर?

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलमीवीरांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. यामध्ये यशस्वी अर्धशतक तर रोहित आणि शुभमन गिल शतकी खेळी करून बाद झाले. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या सर्फराजला मोठी खेळी करण्याची संधी होती. परंतु, इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीरच्या बॉलवर आक्रमक शॉट मारण्याचा नादात तो जो रूटकरवी झेलबाद झाला. यामुळे सुनील गावसकरांनी सामन्याची कॉमेंट्री करताना सर्फराजला खडबोल सुनावले. (Sunil Gavaskar on Sarfaraz Khan)

गावस्करांनी घेतला सर्फराजचा क्लास

सुनील गावसकर 'जिओ सिनेमा'च्या कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले, 'बॉलला फ्लाईट करून सोडण्यात आले होते. त्यामुळे अति उत्साहामध्ये आक्रमक शॉट मारण्याचा हा बॉल नव्हता. परंतु, मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात तो रूटला कॅच देवून बाद झाला. टी ब्रेकनंतर जर तुम्ही पहिला चेंडू खेळत असाल तर स्वत:ला सेटल होण्यासाठी थोडा वेळffff द्या. डॉन ब्रॅडमन यांनी मला सांगितले की, मी प्रत्येक चेंडूला सामोरे जात असताना मला असे वाटते की मी शून्यावर आहे. जरी मी 200 वर आहे. आणि सरफराज सत्राच्या पहिल्याच चेंडूवर असा शॉट खेळत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT