नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
एक वर्षापूर्वी वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर मुळचे सिडकोतील डिजीपी नगर येथील रहिवाशी असलेले युवा उद्योजक याग्निक नंदलाल शिंदे (वय २९) याने गंगापुर रोड भागातील सम्राट ट्रॉपिकाना इमारती मधील दहाव्या मजल्यावरील राहत्या घरी बुधवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गंगापुर रोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
गेल्या एक वर्षापूर्वीच नंदलाल शिंदे यांनी स्वतःच्या पिस्टन मधुन गोळी झाडत आत्महत्या केली होती. आठ दिवसां पूर्वीच वडिलांचे वर्षश्राद्ध होत नाही तोच मुलानेही आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याग्निक याने महिनाभरापूर्वी भारतीय जनता पार्टी पक्षातून मनसेत प्रवेश केला होता. तर आगामी मनपा निवडणुकीची तयारी ही केली होती. पण अचानक टोकाचे पाऊल कोणत्या कारणाने उचलले याबाबत समजु शकले नाही. मयत याग्निक याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ, काका, आजी असा परिवार आहे. यागनिक यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.