Latest

कोल्‍हापूर : डीपीला फोटो न लावल्याने मारहाण; नैराश्यातून युवतीची आत्महत्या

निलेश पोतदार

आजरा : पुढारी वृत्तसेवा; पोळगाव (ता. आजरा) येथील एका अल्पवयीन युवतीने युवकाच्या त्रासाला कंटाळून आत्‍महत्‍या केल्‍याची धक्‍कादायक घटना घडली. या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी किशोर दत्तात्रय सुरंगे (रा. महागाव ता. गडहिंग्लज) याच्यावर आजरा पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. यामुळे किशोरच्या कुटुंबियांनी मुलीच्या कुटुंबियांना लग्नाबाबत विचारणा केली होती. यावेळी मुलीच्या कुटुंबाकडून मुलगीला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न लावून देतो असे सांगितले होते. यानंतर किशोरने मुलीला सोशल मीडियावर डीपीला फोटो लाव नाहीतर तुझ्याशी लग्न करणार नाही असे सांगितले. तसेच याबद्दल आजरा बसस्थानक परिसरात मारहाणदेखील केली होती.

या त्रासाला कंटाळून नैराश्यातून मुलीने मंगळवारी (दि. २६) राहत्या घरात तुळीला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्‍याची घटना समोर आली आहे. मुलीच्या कुटुंबियांनी पोलिस स्‍टेशनमध्ये या घटनेची तक्रार नोंद केली असून, पोलिसांनी युवकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT