पुढारी ऑनलाईन ड्रेस : शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) अबरामसोबत डिनरवर पोहोचली. डिनरवरून परतताना पॅपराजीने सुहानाला स्पॉट केलं होतं. तिला यावेळी चपलामुळे चालणं कठीण गेलं. हा व्हिडिओ समोर येताच सुहानाला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. दुसरीकडे, सुहानाने डीप नेक ड्रेस घातल्याने सर्व कॅमेऱ्यांची नजर तिच्यावरचं खिळली. यावेळी तिचा लहान भाऊ अबराम कॅमेराबद्ध झाला. (Suhana Khan)
रेस्टॉरेंटच्या बाहेर सुहानाला डीप नेक ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये स्पॉट करण्यात आलं. बांधलेले केस आणि ब्लॅक फ्लॅट स्लीपर्स आणि दुसऱ्या हातात मोबाईल अशा लूकमध्ये सुहाना स्पॉट झाली. अबराम टीशर्ट आणि कॅपरीमध्ये दिसला.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रेस्टोरेंटमधून सुहाना पायऱ्या उतरताना दिसते यावेळी ती थोडी धडपडताना दिसते. व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला ट्रोल केले जात आहे. एका युजरने लिहिलं -'हिला कुणीतरी चालायला शिकवा.' आणखी एका युजरने लिहिलं-'ही मलायका अरोरासारखी का चालत आहे?'
शाहरुखची मुलगी सुहाना लवकरच जोया अख्तर दिग्दर्शित द आर्चीज चित्रपटातून बॉलीवूड डेब्यू करेल. सुहानासोबत अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा आमि जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूरदेखील डेब्यू करेल. द आर्चीजची शूटिंग सुरू झाले आहे. हा चित्रपट प्रसिद्ध कॉमिक बुक द आर्चीजवर आधारित आहे.
video – viralbhayani insta वरून साभार