Latest

Sudhanshu Trivedi : डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं ‘पाणी पाजण्याची’ वेळ आलीय – रोहित पवार

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : "छत्रपती शिवाजी महाराजांवर आता #SudhanshuTrivedi हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? पण आता डोक्यावरून पाणी चाललंय. त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं 'पाणी पाजण्याची' वेळ आलीय." असं ट्विट करत राष्ट्रवादी नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधानावरुन चांगलच धारेवर धरलं आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर भारत जोडो यात्रा सुरु आहे. महाराष्ट्रात ही यात्रा असताना राहुल गांधी यांनी सावरकरांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केले होते. यावरुन संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या एका वृत्तसंस्थेने सावरकरांच्या वक्तव्यावरुन चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चेत भाजपची भूमिका मांडण्यासाठी सुधांशू त्रिवेदी उपस्थित होते. यावेळी आपली बाजू मांडताना सुधांशू त्रिवेदी म्हणाले, "सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं राहुल गांधींनी म्हंटलं आहे. त्याकाळी अनेक लोकं तत्कालीन परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? त्यांच्या या वक्तव्यानंतर निषेध व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sudhanshu Trivedi : पाणी पाजण्याची' वेळ आलीय

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या आक्षेपार्ह विधानावरुन महाराष्ट्रासह देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनीही ट्विट करत भाजपासह सुधांशू त्रिवेदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, "छत्रपती शिवाजी महाराजांवर आता हा #SudhanshuTrivedi भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? पण आता डोक्यावरून पाणी चाललंय. त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं 'पाणी पाजण्याची' वेळ आलीय."

हेही वाचा

SCROLL FOR NEXT