Latest

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांचा अचानक राजीनामा; विधी वर्तुळात खळबळ

backup backup

पुढारी वृत्तसेवा, नागपूर : मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी आज अचानक राजीनामा दिल्याने विधी वर्तुळात खळबळ माजली आहे. न्या. देव यांनी न्यायालयात आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर करीत सर्वांनाच धक्का दिला. त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मनाविरुद्ध बदलीसह अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर करताना न्या. देव यांनी सर्व उपस्थितांपुढे दिलगिरी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. माझा कोणावरही राग नसून माझ्यामुळे कोणी दुखावले गेल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो, असे न्या. देव यांनी डायस सोडण्यापूर्वी म्हटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, त्यांनी वकीलांवर नाराजीही व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.

तथापि, नेमक्या कोणत्या कारणापायी व्यथित होऊन न्या. देव यांनी राजीनामा दिला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विधी वर्तुळात मात्र या राजीनाम्याने खळबळ निर्माण झाली आहे. २०१७ मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी न्या. देव हे राज्याचे महाधिवक्ता होते. ते डिसेंबर २०२५ मध्ये सेवानिवृत्त होणार होते, अशीही माहिती आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT