Latest

Sudan Military conflict : सूदानमध्ये परिस्थिती चिघळली; 270 ठार, अनेकांचे खार्तूममधून पलायन; लैंगिक हिंसाचाराचाही अहवाल

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sudan Military conflict : सुदानमध्ये सुरू असलेले लष्करी आणि निमलष्करी दलातील संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाही. मिळालेल्या अद्ययावत माहितीनुसार मृतांचा आकडा 270 हून अधिक नागरिक मारले गेल्याची माहिती मिळत आहे. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी लैंगिक हिंसाचार झाल्याच्या देखील घटनांची माहिती पुढे येत आहे. परिणामी राजधानी खार्तूममधून अनेक नागरिक पलायन करत आहे.

सुदानच्या रॅपिड फोर्स निमलष्करी दलाने स्थानिक वेळेनुसार बुधवारी दुपारी 4 वाजल्यापासून पुढे 24 तासांसाठी संपूर्ण युद्धविराम करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्ष साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार खार्तूममध्ये बुधवारी रात्रीपर्यंत गोळीबार सुरूच होता. (Sudan Military conflict)

शहरातून बाहेर पडताना 33 वर्षीय अलाव्या-तैयब ही महिला म्हणाली की, हे युद्ध थांबले नाही तर खार्तूममधील जीवन अशक्य आहे. बाहेर पडताना मी माझ्या लहान मुलांनी रस्त्यावर पडलेले मृतदेह पाहू नयेत यासाठी प्रयत्न केले कार ते आधीच या आघाताने त्रस्त आहेत, त्यांना उपचारांची मोठी आवश्यकता आहे.

Sudan Military conflict : लैंगिक हिसाचाराच्या घटना; युएनला मिळाला अहवाल

सुदानमध्ये परिस्थिती इतकी चिघळली आहे की, तेथे स्थित परदेशी नागरिकांना तेथून हलवण्यासाठीच्या निर्वासन योजना आखणे देखील कठीण झाले आहे. कारण परदेशी राजदूतांवर देखील हल्ले झाले आहेत. तर मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लैंगिक हिंसाचाराचे अहवाल देखील यूएनला प्राप्त झाले आहे.

यासंदर्भात यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी जाहीर केले की ते गुरुवारी आफ्रिकन युनियन, अरब लीग आणि विकासावरील आंतरसरकारी प्राधिकरणाच्या प्रादेशिक गटाच्या प्रमुखांना भेटतील, असे त्यांच्या प्रवक्त्याने पत्रकारांना सांगितले.

यूएस दूतावासाने एक निवेदन दिले आहे. ज्यावर सुदानमधील अन्य 14 इतर राजनैतिक मिशन्सद्वारे स्वाक्षरी केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, "सुदानी लोक, मुत्सद्दी आणि मानवतावादी मदत कर्मचार्‍यांना बेपर्वापणे धोक्यात आणणार्‍या लढाई दरम्यान" दोन्ही सैन्याने "लोकांना त्यांच्या घरातून बेकायदेशीरपणे बाहेर काढण्यापासून परावृत्त केले पाहिजे."

Sudan Military conflict : सुदानमधील चिघळलेली परिस्थिती

पॅरिसच्या सोरबोन युनिव्हर्सिटीतील सुदान तज्ज्ञ क्लेमेंट देशायस यांच्या म्हणण्यानुसार, "सध्या दोन्ही बाजू जिंकत असल्याचे दिसत नाही आणि हिंसाचाराची तीव्रता पाहता, दोन जनरल वाटाघाटी टेबलवर येण्यापूर्वी गोष्टी आणखी वाईट होऊ शकतात."

त्यामुळे हजारो लोक युद्ध संपण्याची वाट पाहणार नाहीत. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, लोक कारने किंवा पायी चालत खार्तूम सोडू लागले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावर कचऱ्याप्रमाणे टाकलेल्या मृतदेहांच्या दुर्गंधीने हवा भरली होती.

मोहम्मद सालेह, 43, सरकारी कर्मचारी, म्हणाला की खार्तूममधील स्फोटांच्या दहशतीमुळे तो राजधानीच्या आग्नेय, मदानी येथे नातेवाईकांसोबत राहण्यासाठी शहर सोडत आहे. तो म्हणाला, "सैनिक घरांवर हल्ला करतील याची आम्हाला खूप काळजी वाटत होती."

मृतांचा आकडा 270 पेक्षा कितीतरी पटींनी अधिक

दूतावासांच्या म्हणण्यानुसार, प्रारंभिक अंदाजे 270 पेक्षा जास्त नागरिकांच्या मृत्यू झाल आहे, मात्र हा आकडा वाढू शकतो. तर सुदानच्या अधिकृत डॉक्टर्स युनियनच्या म्हणण्यानुसार, खरा आकडा खूप जास्त असल्याचे मानले जाते. कारण अनेक जखमी हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकत नाहीत.

खार्तूमच्या 59 मुख्य रुग्णालयांपैकी सुमारे दोन तृतीयांश रुग्णालये "सेवेबाहेर आहेत", उर्वरित रुग्णालयांच्या सुविधांमध्ये "तीव्र कमतरता" असल्याचे युनियनने म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT