Latest

Suborbital Flights : लवकरच पृथ्वीवर कुठेही फक्त दोन तासात प्रवास; नासाचे सुपरसोनिक विमान X-59 पहिल्या चाचणीसाठी सज्ज

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Suborbital Flights : संपूर्ण जग लवकरच विमान उद्योग अल्ट्राफास्ट हवाई यात्रेच्या युगात प्रवेश करू शकते. नासाचे पहिले सुपरसोनिक विमान X-59 सन ऑफ कॉनकॉर्ड आपल्या पहिल्या चाचणी उड्डाणासाठी सज्ज आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास लांब पल्ल्याचे अंतर अवघ्या काही तासात करता येणार आहे. मात्र, ब्रिटेनने एका संशोधनात केलेल्या दाव्यानुसार सबऑर्बिटल फ्लाईट्समुळे नजीकच्या भविष्यात लवकरच पृथ्वीवर कुठेही दोन तासात प्रवास करणे शक्य होणार आहे. न्यू यॉर्क पोस्टने याचे वृत्त दिले आहे.

नासाने ध्वनीच्या दुप्पट वेगाने प्रवास करणारे पहिले सुपरसॉनिक व्यावसायिक विमान विकसित केले होते. जे 1350 मैल प्रतितास वेगाने प्रवास करत न्यूयॉर्क ते लंडन अवघ्या तीन तासात प्रवाशांना घेऊन जाऊ शकत होते. मात्र, या विमानांची देखभाल करण्यासाठी प्रचंड खर्च होता. तसेच 2000 मध्ये झालेल्या एका हाय-प्रोफाइल क्रॅशमुळे अखेर कॉनकॉर्डचे उड्डाण संपले.

Suborbital Flights : X-59 'सन ऑफ कॉनकॉर्ड'

या घटनेच्या दोन दशकानंतर नासाने कॉनकॉर्डच्या मालिकेतील X-59 हे विमान विकसित केले आहे. याला नासाने 'सन ऑफ कॉनकॉर्ड' असे म्हटले आहे. त्यामुळे आपण आता अल्ट्राफास्ट हवाई प्रवास पूर्णपणे नवीन टप्प्यात प्रवेश करणार आहोत.

जगातील पहिल्या सुपरसोनिक वाणिज्यिक विमान कॉनकॉर्डच्या अंतिम उड्डाणाच्या 20 वर्षानंतर हे एक्स 59 सुपरसोनिक हे विमान विकसित करण्यात आले आहे. त्यामुळेच याचे नाव सन ऑफ कॉनकॉर्ड असे ठेवले आहे. हे सुपरसोनिक विमान आपल्या पहिल्या परीक्षणासाठी सज्ज आहे.

एक्स 59 हे विमान कॉनकॉर्ड पेक्षा लहान आहे. याची अधिकाधिक गती जवळपास 1500 किलोमीटर प्रतितास आहे. त्यामुळे हे विमान न्यूयॉर्क ते लंडन या उड्डाणाचा कालावधी 3 तास 30 मिनिटांनी कमी करू शकतो, असा दावा केला जात आहे. परंतु काही विमान वाहतूक तज्ज्ञ जे नियोजन करत आहेत त्या तुलनेत ते काहीच नाही.

Suborbital Flights : न्यू यॉर्क ते शांघाय अवघ्या 39 मिनिटांत पोहोचणार

सब ऑर्बिटल फ्लाईट्स द्वारे 2033 पर्यंत लंडन ते सिडनी दरम्यान आता 22 तास लागतात मात्र त्यात घट करून हे उड्डाण फक्त दोन तासात होऊ शकते, असा दावा ब्रिटेनचे नागरिक उड्डयन प्राधिकरण द्वारा प्रकाशित करण्यात आलेल्या शोधात करण्यात आला आहे.
या सबऑर्बिटल फ्लाइट्स जेफ बेझोसच्या ब्लू ओरिजिन आणि रिचर्ड ब्रॅन्सनच्या व्हर्जिन गॅलेक्टिक जेट प्रोग्रामद्वारे नियोजित केलेल्या रॉकेटसारखीच दिसतात. ही सबऑर्बिटल उड्डाणे 3500 मैलांच्या आश्चर्यकारक वेगाने, 5632 किलोमीटर प्रति तासाच्या बरोबरीने चालणारी ही उड्डाणे वेळ वाचावण्याच्या अविश्वसनीय संधी देतात.

हे यान नंतर पृथ्वीवर त्याच्या अंतिम गंतव्यस्थानाकडे वेगाने उतरते, ज्यामुळे प्रवासाचा वेळ नाटकीयरित्या कमी होतो. हा वेळ किती कमी होईल. याचे उत्तर द्यायचे झाले तर न्यू यॉर्क ते शांघाय हे पारंपारिक 15 तासांचे उड्डाण फक्त 39 मिनिटात होऊ शकते. तर न्यूयॉर्क ते लंडन जाँट देखील एका तासाच्या आत पोहोचू शकते. संशोधनानुसार दावा आहे की सबर्बिटल उड्डाणे दोन तासांत पृथ्वीवर कुठेही पोहोचू शकतात.

Suborbital Flights : असे आहे X-59 'सन ऑफ कॉनकॉर्ड'

सिंगल-सीट X-59 फक्त 100 फूट (30.5 मीटर) लांब असेल, ज्याचे पंख फक्त 29.5 फूट (9 मीटर) आणि उंची फक्त 14 फूट (4.25 मीटर) असेल. हे 55,000 फूट उंचीवर उड्डाण करण्यास सक्षम असेल आणि त्याचा वेग मॅच 1.4 असेल.

X-59

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT