Latest

खा. शरद पवार लढविणार बारामतीची खिंड !

अमृता चौगुले

खोर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या माध्यमातून बारामती लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार केला असतानाच त्यांना शह देण्यासाठी ज्येष्ठ नेते राज्यसभेचे खासदार शरद पवार पुन्हा एकदा बारामतीच्या रणांगणात उतरण्याच्या शक्यतेवर बारामती मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. खा. शरद पवार हे शिरूर, बीड, सातारा, नाशिक या भागात सभा घेत उमेदवार चाचपणी करीत आहेत. मात्र, बारामतीकडे लक्ष न देता अजूनही ते शांतपणे संयमी भूमिका बजावताना दिसत आहेत. जर-तरचा प्रश्न निर्माण झाला आणि खा.सुप्रिया सुळे यांच्या बाबतीतील वातावरण कठोर बनले गेले, तर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांना स्वतःला हा गड लढविण्यासाठी मैदानात उतरावे लागणार असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

खा. शरद पवार यांनी जर असा डाव ऐनवेळेस जर टाकला आणि स्वतः शरद पवार बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरले गेले, तर भाजपा व महायुतीला याचा मोठा फटका बसला जाण्याची शक्यता आहे. खा.शरद पवार यांना मानणारा तरुणवर्ग सध्या तयार होत असून, जुन्या पिढीतील वर्ग ही शरद पवार यांच्या पाठीशी आजही ठामपणे उभा आहे. एकंदरीतच भाजपाने आखलेल्या रणनीती पुढे या राजकीय डाव पेचामुळे पाणी फिरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. खा.सुप्रिया सुळे यांचा जर विचार केला तर त्यांना कोठे ही तिकीट न देता राज्यसभेवर खासदार म्हणून विचार केला जाण्याची शक्यता आगामी काळात होऊ शकते.

खा.शरद पवार जर ऐनवेळेस बारामती लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खा.शरद पवार यांच्या समोर महायुतीचा प्रबळ दावेदार कोण असणार आहे हे पण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट सध्या भरून न येणारी असून, आज खा.शरद पवार यांनी खासदारकीसाठी प्रबळ उमेदवार शोधण्याची मोहीम सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभेची जागा आपण जिंकणार असा निर्धार केला आहे. भाजपानेदेखील गेली एक वर्षापासून बारामती लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची केली असून, ही जागा कसल्याही परिस्थितीत जिंकायची अशी मांडणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राष्ट्रवादी (खा.शरद पवार) गटाला मोठा धक्का बसला आहे. मतदारसंघात असलेल्या बारामती, दौंड, इंदापूर, भोर, पुरंदर, खडकवासला या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज चेहरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले असल्याने आज खा.सुप्रिया सुळे यांच्या पुढे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मोठा पेच उभा राहिला गेला आहे. खा.शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून चार वेळा खासदार झाले आहेत. सन 1991 ते 1996 , सन 1996 ते 1998 , सन 1998 ते 1999, सन 1999 ते 2004 पर्यंत ते खासदार होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT