Latest

Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टी ११ व्या सत्रांतही तेजीत, उच्चांकी पातळीवर झेप

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी सलग ११ व्या सत्रांत सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० हून अधिक अंकांनी वाढून ६७,७७४ वर पोहोचला. तर निफ्टीने २०,१५० चा वर व्यवहार करत उच्चांकी पातळी गाठली. चीनमधील मजबूत मॅक्रो इकॉनॉमिक डेटा आणि अमेरिकेच्या फेडरल रिर्झर्व्हच्या व्याजदरवाढीची चिंता कमी झाल्याने गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. (Stock Market Updates)

 संबंधित बातम्या 

शेअर बाजारातील आजच्या तेजीत मेटल, ऑटो आणि आयटी स्टॉक्स आघाडीवर आहेत. सेन्सेक्स आज ६७,६५९ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६७,७७४ वर गेला. सेन्सेक्सवर टाटा मोटर्स, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, एम अँड एम, विप्रो, सन फार्मा, मारुती, टीसीएस, आयटीसी, रिलायन्स हे शेअर्स वाढले आहेत. तर एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, टायटन, कोटक बँक, एनटीपीसी, टाटा स्टील हे शेअर्स घसरले आहेत.

चीनमधील ऑगस्ट महिन्यातील औद्योगिक उत्पादन आणि किरकोळ विक्रीतील वाढ अपेक्षेपेक्षा जास्त असल्याची आकडेवारी समोर आल्यानंतर शुक्रवारी आशियाई शेअर बाजारात तेजी दिसून आली. जपानचा निक्केई १.३३ टक्क्यांनी, हाँगकाँगचा हँगसेंग १.२ टक्क्यांनी आणि चीनचा ब्लू चिप्स ०.२ टक्क्यांनी वाढला आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांक काल वाढून बंद झाले होते. (Stock Market Updates)

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT