Latest

Stock Market : सेन्सेक्स शिखरावरून थेट खाली कोसळले; आठवड्याचा शेवटचा दिवस ठरला ‘रेड झोन’

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Stock Market : गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस पूर्णपणे रेड झोन ठरला. सलग सहा दिवस विक्रमी उच्चांकी कामगिरी करत गुरुवारी ऐतिहासिक शिखर गाठणाऱा सेन्सेक्स थेट खाली कोसळला. बाजार बंद होताना सेन्सेक्स 888 अंकांनी खाली घसरला. तर निफ्टी देखील 19750 च्या खाली आला. सर्वात जास्त फटका हा आयटी स्टॉक्सला बसला. इन्फोसिसचे शेअर्स 9 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. तर एकूण आयटी क्षेत्राला 4 टक्क्यांपेक्षा जास्त खाली घसरले. तर दुसरीकडे हिंदुस्थान युनिलिव्हर 4 टक्क्यांनी तर रिलायन्सचे समभाग 2 टक्क्यांनी घसरले. बाजाराचा आज शुक्रवारचा आठवड्याचा शेवट हा लाल दिव्यांनी बंद झाला.

जागतिक बाजारातील संमिश्र संकेतानंतर आज भारतीय शेअर बाजार हा नकारात्मक लाल संकेतांनी उघडला. बाजार उघडल्यानंतर निफ्टी 19800 च्या खाली, सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला; बँक निफ्टी 46150 च्या वर ट्रेड करत होता. बाजार बंद होईपर्यंत आजचा पूर्ण दिवस लाल छटा कायम राहिल्या. तर बाजार बंद होताना सेन्सेक्स 888 अंकांनी खाली घसरला तर निफ्टी देखील 19750 अंकाच्या खाली राहिले.

Stock Market : टॉप गेनर्स आणि लूजर्स

इंडिया मार्ट इंटरमेश लि., रायट्स लि., जिंदाल सॉ लि., युनायटेड स्पिरीट्स लि. आणि अतुल लिमिटेड या कंपन्यांचे शेअर्स बाजार बंद होताना टॉप गेनर्स ठरले. तर इन्फोसिस, सीआयई ऑटोमोटिव्ह इंडिया लि., परसिस्टन्स सिस्टिम लिमिटेड, दालमिया भारत लि. टेक महिंद्रा लि., रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, आयटीसी, अॅक्सिस बँक, आयसीआयीआय बँक या सर्व तोट्यात राहिल्या.

महसूल मार्गदर्शनात कपात केल्याने इन्फोसिसला सर्वाधिक फटका

कमकुवत जागतिक संकेतांवर क्लायंटच्या खर्चातील कमकुवतपणाचे कारण देत, शीर्ष सॉफ्टवेअर सेवा प्रदाता इन्फोसिसने महसूल मार्गदर्शनात कपात केल्याने, शुक्रवारी इन्फोसिससह आयटी क्षेत्रातील सर्वच भारतीय समभाग घसरले. मात्र यामध्ये सर्वाधिक फटका इन्फोसिसला बसला.

फास्ट-मूव्हिंग कंझ्युमर गुड्स फर्म हिंदुस्तान युनिलिव्हरला जून-तिमाहीतील नफ्याचा दृष्टिकोन जास्त किमतीत न मिळाल्याने 2% पेक्षा जास्त तोटा झाला.

Stock Market : सोन्या चांदीच्या दरातही मोठी घसरण

बाजारात आत सोने 350 रुपयांनी घसरून 60,450/10 ग्रॅम; चांदी 750 रुपयांनी घसरली. HDFC सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, कमकुवत जागतिक ट्रेंडमध्ये शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव 350 रुपयांनी घसरून 60,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील व्यवहारात मौल्यवान धातूचा भाव 60,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावला होता. चांदीचा भावही 750 रुपयांनी घसरून 77,200 रुपये प्रति किलोग्रॅम इतका खाली आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे भाव अनुक्रमे 1,966 डॉलर प्रति औंस आणि 24.80 डॉलर प्रति औंस या पातळीवर होते.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT