Stock Market Opening Bell : बाजाराची सुरुवात नकारात्मक; सेन्सेक्स निफ्टी घसरले

Stock Market Opening Bell : बाजाराची सुरुवात नकारात्मक; सेन्सेक्स निफ्टी घसरले

पुढारी ऑनलाइन डेस्क : Stock Market Opening Bell : भारतीय शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारप्रमाणेच आजही नकारात्मक झाली आहे. बाजार सकाळच्या पहिल्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी दोघेही खाली घसरले आहे. जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात बाजारावर लाल छटा पसरली आहे. इन्फोसिसचे शेअर्स 9 टक्क्यांनी घसरले आहे.

Stock Market Opening Bell : निफ्टी 19800 च्या खाली, सेन्सेक्स 600 अंकांपर्यंत खाली घसरला

भारतीय शेअर बाजार जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज सलग दुसऱ्या दिवशी देखील नकारात्मक उघडले. बाजार उघडल्यानंतर निफ्टी 19800 च्या खाली, सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला; बँक निफ्टी 46150 च्या वर ट्रेड करत आहे.

गुरुवारी, निफ्टी 50 ने इंट्राडे 19,991.85 च्या नवीन 52 आठवड्यांचा उच्चांक स्थापित केल्यानंतर 146 अंक किंवा 0.74% ने 19,979.15 वर बंद झाला. सेन्सेक्स 474.46 अंकांनी किंवा 0.71 टक्क्यांनी वाढून 67,571.90 वर स्थिरावला आणि 67,619.17 इंट्राडे वर नवीन सार्वकालिक उच्चांक गाठला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी बँक 1.13%, निफ्टी ऑटो 0.41%, निफ्टी प्रायव्हेट बँक 1.15%, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 1.02% वधारले, निफ्टी फार्मा 1.46% आणि निफ्टी मीडिया 1.11% वाढले तर निफ्टी 6% % वाढले.

इन्फोसिसचे शेअर्स 9 टक्क्यांनी घसरले

भारतीय बाजारात इन्फोसिसचे शेअर्स आज सकाळी 9 टक्क्यांपर्यंत खाली घसरले. इन्फोसिसचे शेअर्स गेल्या दोन दिवसांपासून घसरत आहेत. भारतीय IT प्रमुख कंपनीने त्यांचे FY24 CC महसूल वाढ मार्गदर्शन सुधारित केल्याने आज इन्फोसिसच्या शेअरची किंमत 9% ची घसरण होऊन 1311.60 रुपयांवर आली आहे. पूर्वीच्या 4-7% च्या तुलनेत ते 1-3.5% पर्यंत खाली आले आहे.

Stock Market Opening Bell : जागतिक बाजाराचा ट्रेंड काय

आशियाई बाजार लाल रंगात व्यवहार करत होते – जपानचा निक्केई 225 0.29% घसरला, चीनचा शांघाय कंपोझिट इंडेक्स 0.21% घसरला, दक्षिण कोरियाचा KOSPI 0.25% आणि हाँगकाँगचा हँग सेंग 0.02% घसरला. यूएस बाजार गुरुवारी संमिश्र सत्रात संपला – डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज (DJIA) 0.47% वाढला, S&P 500 0.68% घसरला आणि टेक-हेवी नॅस्डॅक 2.05% घसरला होता.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news