Latest

Stock Market Closing Bell | शेअर बाजार नव्या उच्चांकावर, निफ्टी २०,१०० पार, कोणते शेअर्स तेजीत?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात सलग १० व्या सत्रांत तेजीची घौडदौड कायम राहिली. आशियाई बाजारातून मजबूत संकेत आणि आयटी तसेच बँकिंग स्टॉक्सधील खरेदीमुळे आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने आज उच्चांक गाठला. त्यानंतर दोन्ही निर्देशांक उच्चांकावर जाऊन खाली आले. आजच्या काहीशा अस्थिर ‍‍व्यवहारात सेन्सेक्स ५२ अंकांच्या वाढीसह ६७,५१९ वर स्थिरावला. तर निफ्टी ३३ अंकांनी वाढून २०,१०३ वर बंद झाला. (Stock Market Closing Bell)

क्षेत्रीय पातळीवर एफएमसीजी (FMCG) निर्देशांक किरकोळ किरकोळ घसरणीसह बंद झाला. तर ऑईल आणि गॅस, रियल्टी, मेटल आणि PSU बँक प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रत्येकी १ टक्क्यानी वाढले.

 संबंधित बातम्या

अमेरिकेतील महागाईवाढीच्या आकडेवारीने फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीला विराम देण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज आशियाई बाजारात मजबुती दिसून आली. भारतीय शेअर बाजाराने आज तेजीत सुरुवात केली होती. सेन्सेक्स आज ६७,६२७ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६७,७७१ वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक २०,१२७ वर खुला झाला होता. त्यानंतर तो २०,१६७ वर सर्वकालीन उच्चांकावर गेला. त्यानंतर दोन्ही निर्देशांक उच्च पातळीवरुन खाली आले.

सेन्सेक्सवर एम अँड एम, टाटा स्टील, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, पॉवर ग्रिड हे शेअर्स १ ते २ टक्क्यांदरम्यान वाढले. इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, एलटी हे शेअर्सही वाढले. तर एशियन पेंट्स, आयटीसी, सन फार्मा, टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक बँक, टीसीएस या शेअर्समघ्ये घसरण झाली.

साखर कारखान्यांचे शेअर्स १३ टक्क्यांनी वधारले

२०२३-२४ च्या पीक हंगामात महाराष्ट्रातील साखर उत्पादनात १४ टक्के घट होणार असल्याच्या शक्यतेने गुरुवारी एनएसईवर साखर कारखान्यांचे शेअर्स सुमारे १३ टक्क्यांनी वाढले. यात दालमिया शुगरचा शेअर टॉप गेनर राहिला. तर धामपूर शुगर, अवध शुगर अँड एनर्जी, बलरामपूर चिनी मिल्स, राणा शुगर, श्री रेणुका शुगर्स, द उगर शुगर, द्वारिकेश शुगर, ईद पॅरी आणि त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज यांचे शेअर्स ६ ते १२ टक्क्यांपर्यंत वाढले.

कमी पावसामुळे ऊस उत्पादनात घट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, साखर उद्योगातील आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, देशात साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात ऑगस्ट महिना कोरडा गेला आहे. यामुळे आगामी गळीत हंगामात साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, साखरेचे दर वाढले आहेत. ( Stock Market Closing Bell)

परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीवर जोर

एक्सचेंज डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी निव्वळ आधारावर १,६३२ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ८५० कोटींच्या किमतीचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT