Latest

Stock Market Closing Bell | बाजारात जोरदार रिकव्हरी, गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का, नेमकं काय घडलं?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजार सोमवारी (दि.१३) सुरुवातीच्या मोठ्या घसरणीतून सावरत वाढून बंद झाला. सेन्सेक्स १११ अंकांनी वाढून ७२,७७६ वर बंद झाला. तर निफ्टी ४८ अंकांच्या किरकोळ वाढीसह २२,१०४ वर स्थिरावला. विशेष म्हणजे सेन्सेक्सने आजच्या ट्रेडिंग सत्रात दिवसाच्या निच्चांकावरून ९१० अंकांची रिकव्हरी केली.

बाजारातील ठळक घडामोडी

  • सेन्सेक्स १११ अंकांनी वाढून बंद
  • निफ्टी २२,१०४ वर स्थिरावला
  • दिवसांच्या निच्चांकावरून सेन्सेक्स ९१० अंकांनी सावरला
  • टाटा मोटर्सचा शेअर्स ८.३ टक्क्यांनी घसरला
  • सिप्लाचा शेअर्स ६ टक्क्यांनी वाढून बंद
  • निफ्टी ऑटो निर्देशांकाची १.७ टक्क्यांनी घसरण

क्षेत्रीय आघाडीवर काय स्थिती?

क्षेत्रीय पातळीवर टाटा मोटर्स शेअर्सच्या घसरणीमुळे निफ्टी ऑटोची कामगिरी सर्वात खराब राहिली. हा निर्देशांक १.६८ टक्क्यांनी घसरला. निफ्टी PSU Bank, ऑईल आणि गॅस अनुक्रमे १.२ टक्के आणि ०.८ टक्क्यांनी घसरले. तर निफ्टी फार्मा १.८ टक्क्यांनी वाढला. निफ्टी मेटल आणि रियल्टी प्रत्येकी १.३ टक्क्यांनी वाढले. निफ्टी बँक ०.७ टक्के, निफ्टी आयटी ०.४ टक्क्यांनी वाढला.

शेअर बाजारात अस्थिरता

एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि.१३) मतदान सुरु असताना दुसरीकडे शेअर बाजारात सकाळच्या व्यवहारात अस्थिरता दिसून आली होती. त्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेला विक्रीचा मारा आणि देशांतर्गत महागाईची आकडेवारी जाहीर होण्यापूर्वी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले होते. सुरुवातीला सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी घसरून ७२ हजारांच्या खाली आला होता. तर निफ्टी २०० हून अधिक घसरून २१,८४० पर्यंत खाली आला होता. त्यानंतर दोन्ही निर्देशांकांनी दुपारी पुन्हा जोरदार रिकव्हरी करत गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला.

कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, सन फार्मा, टीसीएस, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एलटी, टाटा स्टील, पॉवर ग्रिड शेअर्स वाढले. तर टाटा मोटर्सचा शेअर्स टॉप लूजर ठरला. हा शेअर्स ८ टक्क्यांनी घसरून ९४८ रुपयांवर आला. त्याचसोबत भारती एअरटेल, एसबीआय, टायटन, नेस्ले इंडिया, एम अँड एम हे शेअर्स घसरले.

sensex closing

एनएसई निफ्टीवर सिप्ला, एशियन पेंट्स, अदानी पोर्टस, अदानी एंटरप्रायजेस, डिव्हिस लॅब हे शेअर्स सर्वाधिक तेजीत राहिले. हे शेअर्स २ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर टाटा मोटर्स, बीपीसीएल, श्रीराम फायनान्स, भारती एअरटेल, कोल इंडिया हे शेअर्स घसरले.

Nifty 50

मजबूत कामगिरीनंतरही टाटा मोटर्सचे शेअर्स का घसरले?

गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅनले आणि नोमुरा या तीन प्रमुख जागतिक ब्रोकरेज कंपन्यांनी टाटा मोटर्स शेअर्सला डाउनग्रेड केले आहे. परिणामी टाटा मोटर्सचा शेअर्स (Tata Motors Share Price) सोमवारी बीएसईवर ८ टक्क्यांनी घसरून ९४८ रुपयांवर आला. या कंपनीचे चौथ्या तिमाहीतील निकाल मजबूत आहे. टाटा मोटर्सचा चौथ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा २२२ टक्क्यांनी वाढून १७,४०७ कोटी झाला आहे, तर ऑपरेशन्समधून त्यांचा महसूल १३ टक्के वाढून १.२ लाख कोटी झाला आहे. असे असूनही त्यांचे शेअर्स आज गडगडले.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT