Latest

Stock Market Closing Bell | सलग दुसऱ्या दिवशी घसरण, सेन्सेक्स ३६५ अंकांनी घसरून बंद, जाणून घ्या मार्केटमधील घडामोडी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : जागतिक कमकुवत संकेतांदरम्यान आज शुक्रवारी शेअर बाजारात घसरण राहिली. सेन्सेक्स ३६५ अंकांनी घसरून ६४,८८६ वर बंद झाला. तर निफ्टी १२० अंकांच्या घसरणीसह १९,२६५ वर स्थिरावला. आज सर्व क्षेत्रात खरेदी दिसून आली. क्षेत्रीय पातळीवर कॅपिटल गुड्स, FMCG, पीएसयू बँक, मेटल, रियल्टी, पॉवर प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले. तसेच सलग ४ दिवसांच्या तेजीनंतर आज मिडकॅप निर्देशांकावर दबाव दिसून आला. बीएसई मिडकॅप इंडेक्स जवळपास १ टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स ०.२ टक्क्यांनी खाली आला. (Stock Market Closing Bell)

आरबीआयने दिलेले महागाईबाबत जोखीम असल्याचे संकेत आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी, आज शुक्रवारी शेअर बाजारात घसरण झाली.

'हे' होते टॉप लूजर्स, टॉप गेनर्स

सेन्सेक्स आज ६५ हजारांवर खुला झाला होता. त्यानंतर तो ६४,८०० पर्यंत आला. सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एलटी, अल्ट्राटेक, एम अँड एम टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, एचसीएल टेक, आयटीसी, एनटीपीसी, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, टाटा स्टील, एसबीआय हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले. तर बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, भारती एअरटेल हे शेअर्स वाढले.

निफ्टीवर बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, ओएनजीसी हे शेअर्स टॉप गेनर्स होते. तर डॉ. रेड्डीज, अदानी पोर्टस्, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू आणि एलटी हे शेअर्स टॉप लूजर्स होते.

जिओ फायनान्शियलला दिलासा

शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये अडकलेला जियो फायनान्सियलचा शेअर आज सावरला. हा शेअर १.६९ टक्के घसरून २१२ रुपयांवर आला. (Stock Market Updates) दरम्यान, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसला सेन्सेक्स आणि इतर बीएसई निर्देशांकातून काढून टाकण्याचा निर्णय तीन दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. २४ ऑगस्ट आणि २५ ऑगस्ट रोजी हा शेअर्स घसरून लोअर सर्किटमध्ये आला. JFSL आता ३१ ऑगस्ट रोजी सर्व S&P BSE निर्देशांकांमधून काढून टाकले जाईल. (Stock Market Closing Bell)

झोमॅटोचे शेअर्स ४ टक्क्यांनी घसरले

जपानी बहुराष्ट्रीय गुंतवणूकदार सॉफ्टबँक ब्लॉक डीलमध्ये झोमॅटोमधील (Zomato shares) त्यांची हिस्सेदारी विकू शकते. याबाबतचे वृत्त CNBC-TV18 ने सूत्रांचा हवाल्याने दिले आहे. या पार्श्वभूमीवर झोमॅटोचा शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात सुमारे ४ टक्क्यांनी घसरून ९०.४६ रुपयांवर आला. गुरुवारी हा शेअर ९३.७९ रुपयांवर स्थिरावला होता.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT