Latest

फक्त एका खोलीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याला लाखो रुपये कमवा!

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क

सध्याच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाईला सामोरं जावे लागत आहे. त्यामुळे अनेकजण कमी गुंतवणुकीत जास्त फायदा कोणत्या व्यवसायातून मिळेल याची चाचपणी करत असतात. असाच एक व्यवसाय आहे जो एका छोट्या खोलीत सुरू केला जावू शकतो. आणि तो सुरू करण्यासाठी गुंतवणूकही कमी प्रमाणात आहे. वेळ देवून योग्य पद्धतीने हा व्यवसाय केला तर महिन्याला लाखो रूपये कमवण्याची संधी उपलब्ध होवू शकते. शेतीशी संबंधीत असणाऱ्या या व्यवसायाचे नाव आहे मशरूम शेती.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची गरज नाही. फक्त काही हजार रुपये गुंतवून तो सुरू केला जावू शकतो. मशरूम शेती व्यवसाय खूप फायदेशीर आहे. यामध्ये खर्चाच्या 7 ते 10 पट नफा मिळू शकतो. त्याचबरोबर बाजारात गेल्या काही वर्षांत मशरूमची मागणीही वाढल्याचे दिसून येते. ही परिस्थिती पाहता मशरूम लागवडीचा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.

मशरूमची शेती कशी करावी

सर्वसाधारणपणे मशरूमची लागवड ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत करण्यात येते. मशरूम तयार करण्यासाठी गहू किंवा तांदळाच्या पेंढ्यामध्ये काही रसायन मिसळून कंपोस्ट खत तयार केले जाते. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी एक महिना लागतो. यानंतर, मशरूमच्या बिया एका कठीण जागेवर 6-8 इंच जाडीचा थर देऊन पेरल्या जातात, ज्याला स्पॉनिंग देखील म्हणतात. त्यानंतर बिया कंपोस्ट खताने झाकल्या जातात.

सुमारे 40-50 दिवसांत, तुमचा मशरूम कापून विकण्यासाठी तयार होते. मशरूमची लागवड उघड्यावर केली जात नाही, त्यासाठी शेड एरिया आवश्यक आहे. जे तुम्ही खोलीतही करू शकता.

मशरूमची लागवड करताना खूप काळजी घ्यावी लागते. इतर व्यवसायाच्या तुलनेत या व्यवसायात फारशी स्पर्धा नाही. त्याच्या लागवडीसाठी तापमान सर्वात महत्वाचे आहे. हे 15-22 अंश सेंटीग्रेड दरम्यान घेतले जाते. उच्च तापमानामुळे पीक निकामी होण्याचा धोका आहे. लागवडीसाठी आर्द्रता 80-90 टक्के असावी. चांगले मशरूम वाढण्यासाठी, चांगले कंपोस्ट असणे आवश्यक आहे. फार जुने बियाणे लागवडीसाठी घेऊन चालत नाही अन्यथा मशरूमच्या चांगल्या दर्जाच्या उत्पादनावर परिणाम होतो. ताजे असतानाच मशरूमची विक्री केल्यास त्याचा चांगला भाव मिळतो.

मशरूम लागवडीचे प्रशिक्षण घ्या

सर्व कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन केंद्रांमध्ये मशरूम लागवडीचे प्रशिक्षण दिले जाते. जर तुम्ही त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचा विचार करत असाल, तर तज्ज्ञांकडून चांगले प्रशिक्षण घेतल्यास फायदा होईल. जागेचा विचार करता, प्रति चौरस मीटमध्ये 10 किलो मशरूम आरामात तयार करता येतो. कमीत कमी 40×30 फूट जागेत तीन-तीन फूट रुंद रॅक बनवून मशरूमची लागवड करता येते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT