Latest

The Archies : स्टारकिड्सचा ‘द आर्चीज’ पाहण्यासाठी प्रतीक्षा कशाला, पाहा नेटफ्लिक्सवर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज'ची (The Archies) रिलीज डेट संपली आहे. हा चित्रपट डिसेंबरमध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्यासह अनेक स्टार किड्स दिसणार आहेत. द आर्चीज: झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. आजपासून ३ महिन्यांनंतर म्हणजेच डिसेंबरमध्ये हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आता लवकरच चाहत्यांना ७ डिसेंबर रोजी ओटीटीवर चित्रपट पाहायला मिळणार आहे. (The Archies)

संबंधित बातम्या-

या चित्रपटात स्टारकिड्स असून नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा आणि आणखी काही नवे चेहरे चित्रपटात डेब्यू करत आहेत.

चित्रपटाच्या निर्मात्याच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट अमेरिकेतील प्रसिद्ध कॉमिक बुक सीरीज 'द आर्चीज' वर आधारित आहे. चित्रपटात मैत्री, स्वातंत्र्य, प्रेम, संघर्ष आणि बंडखोरी दाखवण्यात आली आहे. यासोबतच हा चित्रपट प्रेक्षकांना काल्पनिक पर्वतीय शहर रिव्हरडेलच्या सहलीवर घेऊन जाणार आहे.

निर्मात्या रीमा कागती आणि आयशा देवित्रे यांनी मिळून चित्रपटाची कहाणी लिहिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT