Latest

ST Strike Kolhapur : मध्‍यवर्ती बस स्‍थानक परिसरात एसटी कर्मचार्‍याचा आत्‍महत्येचा प्रयत्‍न

रणजित गायकवाड

एसटी कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन सुरू (ST Strike Kolhapur) असतानाच बुधवारी दुपारी एका कर्मचार्‍याने एसटीच्‍या विश्रामगृहातील फॅनला गळफास लावून घेऊन आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला. प्रसंगावधान राखून अन्‍य कर्मचार्‍यांनी त्‍याला यातून वाचवले. या प्रकाराने एसटीतील कर्मचारी व अधिकारी यांची चांगलीच धावपळ उडाली. बुधवारी दुपारी बाराच्‍या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेतले, त्‍याचे समुपदेशन करुन त्‍याला कुटूंबियांच्‍या ताब्‍यात देण्‍यात आले. सदानंद सखाराम कांबळे हे या एसटी कर्मचार्‍याचे नाव आहे.

(ST Strike Kolhapur) कांबळे हे गगनबावडा आगाराकडे चालक आहेत. एसटीच्‍यावतीने चालकांसाठी प्रशिक्षण देण्‍यात येते, हे प्रशिक्षण घेण्‍यासाठी तो मध्‍यवर्ती बस स्‍थानक परिसरातील एसटीच्‍याविभागीय कार्यालयात आला होता. पण सर्व कर्मचारी संपावर असल्‍यामुळे प्रशिक्षण होऊ शकले नाही. त्‍यामुळे सदानंद कांबळे हा मध्‍यवर्ती बस स्‍थानकात एसटी कर्मचार्‍यांनी सुरु केलेल्‍या आंदोलनस्‍थळी गेला. तेथे कांही वेळ थांबले, तेथे थोडावेळ थांबून तो मध्‍यवर्ती बस स्‍थानकाच्‍या आवारात असलेल्‍या कर्मचार्‍यांच्‍या विश्रामधावर गेला. तेथे त्‍याने तळमजल्‍यातील फॅनला टॉवेल बांधून त्‍याचा गळफास लावून घेण्‍याचा प्रयत्‍न केला, हा प्रकार अन्‍य कर्मचार्‍यांच्‍या निदर्शनास आला.

प्रसंगावधान राखून अन्‍य कर्मचार्‍यांनी त्‍याला धरुन त्‍याच्‍या गळ्याचा फास सोडला व त्‍याला तेथून बाहेर काढले. याची माहिती आंदोलनस्‍थावरील अन्‍य कर्मचार्‍यांना समजताच सर्व कर्मचारी त्‍या ठिकाणी धावून आले. दरम्‍यान एसटीचे विभाग वाहतूक नियंत्रक रोहन पलंगे, विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव, वरिष्‍ठ आगार व्‍यवस्‍थापक अजय पाटील यांच्‍यासह अन्‍य अधिकारी तेथे आले.

दरम्‍यान, या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस ठाण्‍याचे पोलिस आले. पोलिसांनी या कर्मचार्‍याचे जबाब नोंदवले. त्‍यानंतर त्‍या कर्मचार्‍याच्‍या कुटूंबियांना बोलावून त्‍याला त्‍यांच्‍या ताब्‍यात देण्‍यात आले. कर्मचार्‍यांनी सयंमाने घ्‍यावे, कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन विभाग नियंत्रण रोहन पलंगे यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT