Latest

ST Strike Kolhapur : कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारच्या घोषणेचा निषेध

backup backup

ST Strike Kolhapur : मागच्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नावर तोडगा निघाल्याने संप मिटणार अशी आशा व्यक्त केली जात होती. दरम्यान राज्य सरकारकडून सटी कर्मचार्‍यांना पगारवाढ करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

परंतु कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्याकडून राज्य सरकारच्या घोषणेचा निषेध परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केलेले वाढीव वेतन आम्हाला मान्य नसल्याचे सांगण्यात आले. कोल्हापुरातील राज्य सरकारच्या विरोधात एसटी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी केली. एसटी कर्मचाऱ्यांना मागण्या मान्य नसल्याने कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्‍यासह मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती.

ST Strike Kolhapur : अनिल परब म्हणाले,

कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय

१ ते १० वर्षाच्या कामगारांच्या पगारात ५ हजार वाढ

१ ते २० वर्ष नोकरी झालेल्यांसाठी ४ हजार रुपयांची वाढ

दरवाढ आणि भत्ता राज्य सरकार कर्मचाऱ्यांप्रमाणेच देणार

अहवालानंतर विलीनीकरणावर निर्णय होणार

पगारवाढ नोव्हेंबर महिन्यांपासूनच होणार

पगार वेळेत राज्य सरकारची हमी

सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी मान्यता दिली आहे

कामगारांनी उद्यापासून कामावर हजर व्हावे

निलंबन तातडीने रद्द करणार असल्याची माहिती देण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT