Latest

Kolhapur News :पुणे-बंगळूर महामार्गावरील टोप येथे एसटी बस पलटी: २२ प्रवासी जखमी

अविनाश सुतार

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : मुंबईहून चंदगडकडे जाणारी एसटी बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सिमेंटच्या दुभाजकाला धडकून पलटी झाली. यात २२ प्रवासी जखमी झाले. ही घटना पुणे – बंगळूर महामार्गावरील टोप येथील बिरदेव मंदिराजवळील वळणावर आज (दि.२७) पहाटे ४ च्या सुमारास घडली. जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाल्याचे सांगितले जात आहे. Kolhapur News

शिरोली पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ठाण्याहून कोल्हापूर, गडहिंग्लज मार्गे राज्य परिवहन महामंडळाची स्लीपर कोच एसटी बस (एमएच ०९ एफ एल ०९६७ ) २८ प्रवासी घेवून चंदगडला जात होती. यावेळी ही बस टोप गावातील बिरदेव मंदिराजवळील वळणावर पहाटे ४ च्या सुमारास पलटी झाली. हा अपघात चालकाच्या निद्रा अवस्थेत झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले आहेत. Kolhapur News

Kolhapur News : १८ जखमींची नावे पुढीलप्रमाणे –

गणेश शिंदे, सचिन लोकरे, सुरेखा प्रधान, संजय सादू पाटील, कल्पणा जोतिबा पाटील, विद्याधर दळवी, लक्ष्मी गोविंद ठेबूरडे, रसिका सचिन डावरे, बलवंत सुतार, ताराबाई बाळू दाभोल, निलेश देवकर, मनस्वी शिंदे, सविता संकपाळ, प्रतीक्षा जाधव, श्रीकांत रेडेकर, अंकिता म्हापणकर, प्रतिक भगवान धार, अंजली रेडेकर अशी नावे आहेत.
या एसटी बसच्या दुसऱ्या चालकाकडून हा अपघात झाला. पहिला चालक हा ठाण्याहून साताऱ्यापर्यंत होता. तर रात्री २ नंतर साताऱ्याहून दुसरा बदली चालक मुकुंद कुमार ( रा. करंजपेठ, सातारा) हे बस घेवून चंदगडला जात होते.

सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रस्त्यासाठी मातीचा भराव टाकून रस्ता सपाटीकरण सुरु असल्याने या भरावात ही बस पलटी झाल्याने मोठी जीवितहानी टळली. या अपघाताची नोंद शिरोली पोलिसांत झाली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT