Latest

Golden Globe Awards | एसएस राजामौली यांचा RRR गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या शर्यतीत, दोन श्रेणींमध्ये मिळाले नामांकन

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटाला आगामी गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या (Golden Globe Awards 2023) दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. बेस्ट पिक्चर (नॉन इंग्लिश) आणि बेस्ट ओरिजनल साँग (मोशन पिक्चर) या दोन विभागात चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. आपल्या चित्रपटाची दखल घेतल्याबद्दल राजामौली यांनी गोल्डन ग्लोब पुरस्कार आयोजित करणाऱ्या हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशनचे (HFPA) आभार मानले आहेत. HFPA ने बेस्ट पिक्चर (नॉन इंग्लिश) आणि बेस्ट ओरिजनल साँग (मोशन पिक्चर) श्रेणींमध्ये 'RRR'ला नामांकित केले आहे.

RRR मधील 'नाटू नाटू' या गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग (मोशन पिक्चर) श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. 'नाटू नाटू' गाण्याची स्पर्धा आता 'व्हेअर द क्रॉडॅड्स'मधील 'कॅरोलिना, 'गिलेर्मो डेल टोरोज पिनोचियो'मधील 'सियाओ पापा', 'टॉप गन मॅव्हरिक'मधील 'होल्ड माय हँड' आणि 'ब्लॅक पँथर : वाकांडा फॉरएव्हर'मधील 'लिफ्ट मी अप' या गाण्यांशी आहे.

नामांकनाच्या घोषणेनंतर राजामौली यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. "#RRRMovie ला दोन श्रेणींमध्ये नामांकित केल्याबद्दल @goldenglobes येथील ज्युरीचे आभार. संपूर्ण टीमचे अभिनंदन…तुम्ही दाखवलेले प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्व चाहते आणि प्रेक्षकांचे आभार ???." असे राजामौली यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर RRR मधील अभिनेता ज्युनियर NTR ने ट्विट करत म्हटले आहे की, "गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये #RRRMovie ला दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाल्याने आनंद झाला! आपल्या सर्वांचे अभिनंदन… आतुरतेने वाट पाहत आहोत.

'बाहुबली'नंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा 'आरआरआर' प्रेक्षकांसमोर आल्यानंतर या चित्रपटाने सर्व विक्रम मोडले. या चित्रपटाने देश-विदेशात बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला. स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या काल्पनिक कथेवर हा सिनेमा बेतलेला आहे. 'आरआरआर' मध्ये रामायण-महाभारताचा संदर्भ वापरण्यात आला आहे. ज्यु. एनटीआर, रामचरण तेजा, अजय देवगण आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका त्यात आहेत. (Golden Globe Awards 2023)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT