Latest

Srimad Ramayana : ‘श्रीमद् रामायण’ मालिकेच्या टीमने अयोध्येला दिली भेट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'श्रीमद् रामायण' मालिकेच्या टीमने नुकतीच श्रीरामाच्या जन्मभूमीची, अयोध्येची यात्रा केली. या भेटीमुळे त्यांना मालिकेच्या कथेच्या ऐतिहासिक मुळांशी नाते जोडण्याची संधी मिळाली. (Srimad Ramayana) या सर्व मंडळींनी राम जन्मभूमी, कनक भवन आणि हनुमान गढी या ठिकाणांना भेट दिली. (Srimad Ramayana)

संबंधित बातम्या –

स्वस्तिक प्रॉडक्शन्सचे संस्थापक आणि 'श्रीमद् रामायण' चे निर्माते सिद्धार्थ कुमार तिवारी म्हणाले, अयोध्येच्या यात्रेमुळे आमच्या मालिकेला एक सखोलता प्राप्त झाली आहे. या शहराच्या ऐतिहासिक गुंजनाने मालिकेचे वातावरण भारून गेले आहे. त्यामुळे 'श्रीमद् रामायण' मालिकेची मांडणी अधिक समृद्ध बनली आहे.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची भूमिका करणारा अभिनेता सुजय रेऊ म्हणतो, "अयोध्येची यात्रा आमुलाग्र बदल घडवणारी होती. या यात्रेमुळे श्रीरामाचे चरित्र आणि त्याविषयीची माझी समज अधिक वाढली आहे आणि त्यामुळे ही व्यक्तिरेखा अधिक प्रामाणिकपणे आणि सखोलतेने साकारण्याची माझी निष्ठा देखील अधिक बळकट झाली आहे."

माता सीतेची भूमिका करणारी प्राची बन्सल या यात्रेविषयी म्हणते, "प्रत्यक्ष जाऊन अयोध्येचा अनुभव घेणे दैवी स्वरूपाचे होते! सीतेचे सामर्थ्य आणि अलौकिकत्व मला इथे जवळून उमगले."

लक्ष्मणची भूमिका करणारा बसंत भट्टने आपले विचार व्यक्त करताना म्हटले, "अयोध्येतील चैतन्याने मला लक्ष्मणाची भक्ती आणि निष्ठा समजण्याची वेगळी दृष्टी दिली. हा अनुभव माझ्या भूमिकेसाठी माझे मार्गदर्शन करणारा आहे."

हनुमानाची भूमिका करत असलेला निर्भय वधावा म्हणतो, "अयोध्येची आध्यात्मिक ऊर्जा स्फूर्तीदायक होती. त्या ठिकाणी मला हनुमानाच्या अढळ श्रद्धेची आणि निष्ठेची महती समजली." १ जानेवारी पासून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर 'श्रीमद् रामायण' सुरू होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT