Latest

श्रीगणेश साखर कारखान्यामध्ये सत्तांतर, विखे पायउतार; थोरात-कोल्हेंना कौल

अमृता चौगुले

राहाता(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : प्रतिष्ठेच्या केलेल्या श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पॅनलचा पराभव करत सभासदांनी सत्तांतर घडविले. माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात व भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या परिवर्तन पॅनलला कौल देत सभासदांनी सत्त्ता सुर्पूद केली. 19 पैंकी 18 जागांवर विजय मिळवत थोरात-कोल्हे पॅनलने कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवत एकहाती सत्त्ता स्थापन केली. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जनसेवा पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले.

मंत्री विखे पाटील यांना 'होम ग्राउंड'वर पराभवाचा जबर धक्का देत थोरात- कोल्हे गटाच्या गणेश परिवर्तन मंडळाने श्रीगणेश कारखान्यावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. राहाता बाजार समिती निवडणुकीनंतर गणेश साखर कारखाना निवडणुकीत माजी आ. स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक यांना सोबत घेत आ. बाळासाहेब थोरात यांनी विखेंसमोर आव्हान उभे केले. मंत्री विखे पाटील यांच्या मतदारसंघातील कारखान्याची ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली. विखे-थोरात हा पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी समोरासमोर आल्याने निवडणूक चर्चेषत आली.

सोमवारी (दि. 19) राहाता तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली. ब वर्ग मतदार संघाचा निकाल सर्वप्रथम घोषित झाला. त्यात विखे पाटील यांच्या पॅनलचे ज्ञानेश्वर चोळके विजयी झाले. त्यांनी थोरात कोल्हे गटाचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुधाकर नारायण जाधव यांचा पराभव केला. त्यानंतरच्या मतमोजणीत थोरात व कोल्हे यांच्या परिवर्तन मंडळाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. निकाल घोषित झाला त्यावेळी 19 जागांपैकी 18 जागांवर विजय मिळवत कोल्हे-थोरात गटाने गणेश कारखान्यावरील वर्चस्व अधोरेखीत झाले. गुलाल उधळत फटाक्याच्या आतिषबाजी करत थोरात-कोल्हे समर्थकांनी जल्लोष केला. अजित काळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना निवडणुकीत खातेही खोलता आले नाही

आ लंकेही पोहचले राहात्यात

विखे पॅनलचा पराूभव झाल्याचे समजताच राष्ट्रवादीचे आ. नीलेश लंके राहाता येथे पोहचले. आ.बाळासाहेब थोरात, विवेक कोल्हे यांच्यासह विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय ते वीरभद्र मंदिर प्रांगणापर्यंत नगर मनमाड महामार्गावर विजयी रॅली काढली. बाजार तळावर विजयी सभा घेत त्यांनी सभासदांचे आभार मानले.

ही निवडणूक शेतकर्‍यांनी हातात घेतली होती. प्रचंड दबावाखाली निवडणूक झाली असली तरी मतदारांनी मोकळ्या मनाने मतदान दिले आहे. आता हा कारखाना बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी चालविण्यात येणार आहे.

-नारायणराव कार्ले, माजी अध्यक्ष

दहशतवादाची सुरूवात ज्यांनी केली, त्यांंच्याच दहशतीला राहात्यातूनच फूटपाट दिली आहे. आता परिवर्तनाला सुरूवात झाली आहे. दहशत व दडपशाहीला आता ब्रेक मिळाला आहे. ये तो झाकी है पिच्चर अभि बाकी है.

– नीलेश लंके, आमदार, राष्ट्रवादी.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT