Latest

राज्यात खरिपातील 7 टक्के क्षेत्रावर पेरण्या

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे खरीप हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र 142 लाख हेक्टर असून, 3 जुलैअखेर सुमारे 9 लाख 46 हजार हेक्टरवर म्हणजे 7 टक्के क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पाऊस पडल्यास राज्यात खरिपातील पेरणींच्या कामास वेग येण्याची अपेक्षा कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

खरीप हंगामाकरिता 19 लाख 21 हजार क्विंटल बियाणांची गरज आहे. सद्य:स्थितीत प्राथमिक अंदाजानुसार 21 लाख 78 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. राज्यात 15 लाख 92 हजार 466 क्विंटल (82%) बियाणे पुरवठा झालेला आहे. तसेच खरिपासाठी राज्यास 43 लाख 13 हजार मेट्रिक टन खत पुरवठ्याचे नियोजन मंजूर आहे. आतापर्यंत 44 लाख 12 हजार मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 16.53 लाख मे.टन खतांची विक्री झालेली असून, सद्य:स्थितीत राज्यात 27.59 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.

सेंद्रिय शेतीसाठी 1921 कोटींची तरतूद

राज्यात नैसर्गिक, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनला सन 2022-23 ते सन 2027-28 या कालावधीकरिता मुदतवाढ देऊन डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या नावाने योजनेची व्याप्ती दुसर्‍या टप्प्यात राज्यभर वाढवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेकरिता राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेत 1 हजार 920 कोटी 99 लाखांच्या तरतुदीस मान्यता दिली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT