पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी अॅक्शन ब्लॉकबस्टर चित्रपट 'जेलर' (Jailer ) आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित रजनीकांत, शिवा राजकुमार, तमन्ना भाटिया, मोहनलाल अभिनीत चित्रपट 'जेलर' शिस्तबद्ध, पण दयाळू जेलर मुथुवेल पंडियनच्या कथेला सादर करतो. त्याला समजते की, एक गँग त्यांच्या लीडरला तुरूंगामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो त्यांना थांबवण्याच्या मिशनवर जातो. (Jailer)
पाच दशकांहून अधिक काळ कारकीर्द असलेले रजनीकांत हे निश्चितच तमिळ चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार आहेत. त्यांनी तेलुगू, बंगाली आणि मल्याळम चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. रजनीकांत यांनी आगामी चित्रपट 'जेलर' मुथुवेल पंडियनची भूमिका साकारली आहे आणि ते आपल्या अद्वितीय अभिनय कौशल्यांसह निश्चितच चित्रपटाचा स्तर नव्या उंचीवर घेऊन जाण्याची अपेक्षा आहे.
विविध भारतीय भाषांमध्ये तीन दशकांहून अधिक काळ काम करण्यासह शिवा राजकुमार यांनी १२५ हून अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपट 'जेलर'च्या माध्यमातून ते तमिळमध्ये पदार्पण केले आहे. रजनीकांत यांच्यासोबतचा त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. रिपोर्टसनुसार, शिवा राजकुमार या चित्रपटात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत आहेत.
रजनीकांत यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'जेलर'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध सुपरस्टार मोहनलाल यांची निवड करण्यात आली आहे. सूत्रांनुसार, मोहनलाल यांनी चित्रपटात एक खास कॅमिओ साकारला आहे.
तेलुगू चित्रपटांमध्ये आपल्या सनसनाटी अभिनयासाठी प्रसिद्ध प्रतिभावान अभिनेते सुनील यांना रजनीकांत यांच्या थ्रिलर चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी निवडण्यात आले. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये अभिनेता रेट्रो लूकमध्ये दिसला होता.
जॅकी श्रॉफ ३६ वर्षांनंतर चित्रपट 'जेलर'मध्ये रजनीकांतसोबत पुन्हा एकत्र दिसले. आपल्या चार दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत, जॅकी यांनी १३ भाषांमधील २२० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.