Latest

Heinrich Klaasen : दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रिच क्लासेनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

Shambhuraj Pachindre

जोहान्सबर्ग; वृत्तसंस्था : दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हेन्रिच क्लासेन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 32 वर्षीय खेळाडूने आफ्रिकेसाठी चार कसोटी सामने खेळले होते, त्यातील शेवटचा सामना गेल्या वर्षी मार्चमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. (Heinrich Klaasen)

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करताना त्याने 85 सामन्यांत 46.09 ची सरासरी ठेवली होती. त्याने 2019 मध्ये भारताच्या दौर्‍यावर रांचीमध्ये पहिली कसोटी मॅच खेळली. त्यानंतर सिडनी, सेंच्युरियन आणि जोहान्सबर्ग येथे कसोटी खेळण्यासाठी त्याला चार वर्षे वाट पाहावी लागली. 4 कसोटी सामन्यांत 35 या सर्वोत्तम खेळीसह तो फक्त 104 धावा करू शकला आणि त्यानंतर काईल वेरेनने त्याच्या जागी संघात प्रवेश मिळवला. क्लासेन आता त्याचे लक्ष पूर्णपणे मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे वळवले आहे. त्याने 2023 मध्ये टी-20 मध्ये 172.71 आणि वन डे क्रिकेटमध्ये 140.66 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. (Heinrich Klaasen)

क्लासेन म्हणाला, मी योग्य निर्णय घेत आहे की नाही या विचारात काही रात्री झोपलो नव्हतो. मी रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी घेतलेला हा एक कठीण निर्णय आहे, कारण हा खेळाचा माझा आवडता फॉरमॅट आहे. हा एक चांगला प्रवास आहे आणि मला आनंद आहे की मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकलो असतो.'

माझी बॅगी टेस्ट कॅप ही मला मिळालेली सर्वात मौल्यवान कॅप आहे. माझ्या रेड-बॉल कारकिर्दीत ज्यांनी भूमिका बजावली आणि मी आज आहे त्या क्रिकेटरमध्ये मला आकार दिला त्या सर्वांचे आभार, पण सध्या एक नवीन आव्हान आहे आणि मी आहे. त्याची वाट पाहत आहे, असेही तो म्हणाला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT