Latest

Pranab Mukherjee : ‘सोनिया गांधी मला पंतप्रधान करणार नाहीत’ : शर्मिष्‍ठा मुखर्जींच्‍या पुस्‍तकाने राजकीय वर्तुळात खळबळ

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : माजी राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्‍या कन्‍या शर्मिष्‍ठा मुखर्जी ( Sharmistha Mukherjee) यांच्‍या 'इन प्रणब, माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स' या नवीन पुस्‍तकाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या पुस्‍तकात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्‍या निर्णयांवर प्रणव मुखर्जी  (Pranab Mukherjee) यांनी केलेल्‍या तीव्र नाराजीचा उल्‍लेख करण्‍यात आला आहे.

'इन प्रणब, माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स' ('In Pranab, My Father: A Daughter Remembers')  हे पुस्‍तक माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्‍या डायरीत लिहिलेल्या गोष्टींवर आधारित आहे. या पुस्तकात राहुल आणि सोनिया गांधी यांच्या निर्णयांवर प्रणव मुखर्जी यांनी जोरदार टीका केली होती, असा दावा करण्‍यात आला आहे.

काँग्रेस अध्‍यक्षपद एकाच कुटुंबातील पाच जणांकडे तब्‍बल ३७ वर्ष…

शर्मिष्‍ठा मुखर्जी यांच्‍या पुस्‍तकात २८ जुलै २०२० रोजी प्रणव मुखर्जी यांनी त्‍यांच्‍या निधनापूर्वी एक महिना आधाी त्‍यांच्‍या वैयक्‍तिक डायरीमध्‍ये काय लिहिले आहे, याचा उल्‍लेख आहे. प्रणव मुखर्जी यांच्‍या मते, पक्षाला गांधी-नेहरू घराण्यांसाठी संरक्षित खेळाचे मैदान बनवून कॉंग्रेसने आपले लोकशाही चारित्र्य गमावले आहे. याचा देशाच्या राजकारणावर प्रभाव पडला आहे. स्वातंत्र्यानंतर एकाच कुटुंबातील पाच जणांनी ३७ वर्षे काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले असेल, तर तो लोकशाहीच्या वाईट प्रकाराचा पुरावा आहे. आज कुटुंब संघटनेला बळ देत नसून तिची ताकद नष्ट करत आहे. 2004 पासून सोनिया गांधी आणि राहुल यांनी 2001-2003 मध्ये मिळवलेला आधार अंशतः गमावला आहे. त्यांना फक्त इतर प्रादेशिक पक्षांसह काँग्रेसच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन करण्यात रस आहे, असेही प्रणव मुखर्जी यांनी आपल्‍या वैयक्‍तिक डायरीमध्‍ये नमूद केल्‍याचे हे पुस्‍तक सांगतले.

Pranab Mukherjee : सोनिया गांधी मला पंतप्रधान होऊ देणार नाहीत

पुस्तकातील एका उतार्‍यात लेखिका शर्मिष्ठा मुखर्जी यांना आपले वडील प्रणव मुखर्जी यांना ते पंतप्रधान होण्‍याची शक्‍यता आहे का, असे विचारले होते. यावर प्रणव मुखर्जी म्‍हणाले होते की, सोनिया गांधी मला पंतप्रधान होऊ देणार नाहीत. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळविणारा सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी पंतप्रधान होतील, अशी अपेक्षा होती. त्यांना संयुक्‍त पुरोगामी आघाडीतील मित्र पक्षांच्‍या नेत्‍याचाही पाठिंबा होता. मात्र त्यांनी पंतप्रधानपदाचा दावा सोडून दिला होता, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता, असेही प्रणव मुखर्जी यांनी म्‍हटले होते.

1960 पासून प्रणव मुखर्जींना होती डायरी लिहिण्‍याची सवय

'इन प्रणब, माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स' या पुस्‍तकात शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेस नेतृत्त्‍वाखालील संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्‍या वर्षांतील महत्त्वाच्या घटनांमागील रहस्‍य उलगडली आतहे. प्रणव मुखर्जी यांना १९६० च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच डायरी लिहिण्याची सवय लागली होती. हे पुस्‍तक प्रणव मुखर्जी यांच्‍या डायरीतील नोंदी आणि गेल्या काही वर्षांतील विविध मुद्द्यांवर त्‍यांच्‍याशी झालेल्‍या चर्चेवर आधारीत असल्‍याचे शर्मिष्‍ठा मुखर्जी यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

Pranab Mukherjee : राहुल गांधींचे बोलणे राजकीयदृष्ट्या अपरिपक्व

प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या डायरीत राहुल गांधी यांच्‍या काही निर्णयावर टीका केली होती. 2013 मध्ये राहुल यांनी दोषी राजकारण्यांना संरक्षण देण्याचा अध्यादेश नाकारला. यावेळी राहुल गांधींनी अजय माकन यांची पत्रकार परिषद हायजॅक केली आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयाला 'मुर्खपणाचा' म्हटले. हे पूर्णपणे अनावश्यक आहे. त्यांच्याकडे राजकीय कौशल्य नाही पण गांधी-नेहरू घराण्याचा पूर्ण अहंकार आहे. त्‍याचे पत्रकार परिषदेमधील बोलणे राजकीयदृष्ट्या अपरिपक्व आहे, असे प्रणव मुखर्जी यांनी म्‍हटले होते.

… प्रणव  मुखर्जी यांचा चेहरा रागाने लाल झाला होता

'बर्‍याच दिवसांनी मी माझ्या वडिलांना इतके रागावलेले पाहिले आहे! त्याचा चेहरा लाल झाला आणि ते ओरडला, 'तो (राहुल) कोण समजतो? ते मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत. मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीरपणे नाकारणारा तो कोण? पंतप्रधान परदेशात आहेत. आपल्या कृतीचा पंतप्रधान आणि सरकारवर परिणाम होईल, याची जाणीवही त्यांना आहे का? त्याला पंतप्रधानांचा असा अपमान करण्याचा काय अधिकार आहे?', असेही शर्मिष्‍ठा यांनी आपल्‍या पुस्‍तकात म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT