वॉर्सा; पुढारी ऑनलाईन : असे म्हणतात की, या जगात जो आला आहे त्याला कधी ना कधी जावेच लागते. प्रियजनांच्या जाण्याचं दु:ख अनेकदा काही लोकांना मोडून टाकतं. अशा मन हेलावून टाकणाऱ्या अनेक करुण कथा सोशल मीडियावर वायरल होत असतात. त्यात ही या कथांमधील काही वाक्यतर अक्षरश: डोळ्यात पाणी आणतात आणि आपण खूप भावना विवश होतो. नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एक मुलगा आपल्या आईच्या मृत्यूतून कधीच बाहेर येऊ शकला नाही आणि यादरम्यान त्याने असे काही केले की, जे ऐकूण तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. (Son With Mother's Dead Body)
खरं तर, एक व्यक्ती त्याच्या आईच्या मृत्यूने इतका दु:खी झाला होता की त्याने आपल्या आईचा मृतदेह कबरीतून घरी आणला, त्यानंतर तो माणूस दररोज टीव्ही पाहण्यात आणि आईशी बोलण्यात आपला दिवस घालवत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या मृत आईलाही जेवण खायला देण्याचा प्रयत्न सुद्धा केला. आता ही गोष्ट १३ वर्षांनंतर जगासमोर आली आहे आणि सर्वजण या घटनेवर आश्चर्य व्यक्त करीत आहेत. आईच्या मृत्यूचे दुख: कोणाला होत नाही. अनेक जण या दुखा:तून वर्षानुवर्षे सावरु शकत नाहीत. पण या व्यक्तीला आपल्या आईच्या जाण्याने इतके दुख: झाले की तो तिच्या शिवाय जगू शकत नव्हता. म्हणून त्याने चक्क दफन केलेला मृतदेह खोदून बाहेर काढला. (Son With Mother's Dead Body)
युके येथील एका वृत्तपत्राच्या बातमी नुसार, पोलंड येथील एका व्यक्तीला आपल्या आईच्या मृतदेहाला ममी बनवून आणि १३ वर्षे आपल्या सोबत ठेवल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. ७६ वर्षांच्या या व्यक्तीचे नाव एल. मॅरियन असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एके दिवशी त्याच्या मेव्हण्याने दक्षिण-पश्चिम पोलंडच्या रॅडलिन येथे राहणाऱ्या एल मारियनला घराबाहेर वेड्यासारखे फिरताना पाहिले, त्यानंतर एके दिवशी मॅरियन यांच्या या नातेवाईकाने त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. एल मॅरियनचा पाहुणा मॅरियन याच्या घरात शिरल्यावर तो तेथील दृष्य पाहून अवाक झाला. घरात प्रवेश करताच समोरच्या सोफ्यावर एल मॅरियनच्या आईचा मृतदेह सोप्यावर बसेलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले. (Son With Mother's Dead Body)
येथील स्थानिक भाषेतील पोलिसांच्या वेबसाईटवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहले आहे की, मॅरियन याच्या घरात सोफ्यावर बसेलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. हा मृतदेह मॅरियनच्या आईचा असल्याचा पोलिसांना संशय होता. म्हणून पोलिसांनी मॅरियनच्या आईला दफन करण्यात आलेल्या जागेची झडती घेतली तेव्हा त्यांना त्या ठिकाणी मृतदेह आढळून आला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एल. मॅरियनच्या आईचा मृतदेह दफन केल्यानंतर मॅरियनने लगेच दफन केलेला मृतदेह खनून काढला आणि तो मृतदेह घरी नेला. मॅरियनच्या घरी अनेक रसायने आढळून आली आहेत. त्या रसायनांच्या आधारे त्याने आईच्या मृतदेहास ममी बनवून ठेवले होते. पोलिसांनी एल. मॅरियनची मानसिक अवस्था ठिक नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.
अधिक वाचा