Latest

कोणीतरी विरोधात लढणारच : खा. सुप्रिया सुळे

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  माझ्याविरोधात भाजप तीनदा लढला आहे. यंदाही कोणी तरी लढेलच ना? आपण सर्वांचा सन्मान केला पाहिजे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. बारामती दौर्‍यावर रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर टीका केली. त्या म्हणाल्या की, पक्ष फोडण्याऐवजी भाजपने विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. देशात आणि राज्यात अनेक विषय आहेत. संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या विशेष अधिवेशनात सर्वसामान्य जनतेच्या पदरात काही पडले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, आमच्याकडून तरी लोकशाही आहे. शेवटी कोणीतरी माझ्याविरोधात लढणारच ना? आपण सगळ्यांनी याचा मानसन्मान केला पाहिजे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT