Latest

सोलापूर : बार्शीत शोभेच्या दारुच्या कारखान्यात स्फोट, ७ कामगारांचा होरपळून मृत्यू

Shambhuraj Pachindre

बार्शी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पांगरी-शिराळे मार्गावर असलेल्या शोभेच्या दारुच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना रविवारी (दि.१) दुपारी घडली आहे. कारखान्यामध्ये स्फोट सुरुच आहेत. पांगरी येथील इसमाचा कारखाना आहे. या कारखान्यातील .
स्फोटात ७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या कारखान्यात महिला अधिक काम करतात.

आगीमुळे कारखान्याची राखरांगोळी झाली आहे. पण, कारखान्यामध्ये कितीजण कामाला होते त्याचा शोध आता सुरु आहे. परिसरातील जो-तो कारखान्याकडे धाव घेत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बार्शी तालुक्यात ही दुर्घटना घडली असून यामध्ये  कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

बार्शी नगपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, कारखान्यातून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याने बचावकार्यास अडचणी निर्माण येत आहेत. दुपारी ४ पर्यंत  मृतदेह कारखान्यातून बाहेर काढण्यात आले होते तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT