Latest

सोलापूर : महावितरणचे सहायक अभियंता कुटुंबासमवेत गायब, सुसाईड नोटने खळबळ

backup backup

भोसे (क.) : पुढारी वृत्तसेवा : महावितरण कंपनीचे भोसे येथील शाखा सहायक अभियंता गणेश वगरे हे आत्महत्येची चिठ्ठी लिहून परिवारासह गेल्या 24 तासांपासून बेपत्ता झाले आहेत. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पंढरपूर पोलिसांत बेपत्ताची नोंद झाली असून, पोलिस शोध घेत आहेत.याबाबत त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, प्रहार अपंग संघटनेच्या पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील एका पदाधिकार्‍याने मला नाहक त्रास दिला. या त्रासाला व बदनामीला वैतागून मी आत्महत्या करीत आहे. ही चिठ्ठी लिहून ते गुरुवारी (दि. 3) सायंकाळी सात वाजल्यापासून पत्नी आणि दोन मुलींसह गायब झाले आहेत.

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील महावितरण कंपनीच्या शाखा कार्यालयामध्ये गणेश वगरे यांच्याकडे सहाय्यक अभियंता म्हणून ऑक्टोबर 2021 पासून महावितरण शाखा कार्यालय, भोसे येथील रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.पटवर्धन कुरोली येथील रहिवाशी व प्रहार अपंग क्रांती संघटनेचे एक पदाधिकारी व त्याचा भाऊ त्यांचे कधीही बिल न भरलेले घरगुती वीज कनेक्शन घोडके वायरमन यांनी कट केल्याचा राग मनात धरून वायरमन घोडके आणि गणेश वगरे यांच्याविरुद्ध प्रहार संघटनेच्या नावाने आरोप केले होते.

याबाबत वरिष्ठ कार्यालयाने संबंधित तक्रारींची समिती मार्फत चौकशी करून त्यात काही तथ्य नसल्याचे त्यांना लेखी कळविले होते. तरीसुद्धा तो पदाधिकारी आणि त्याचा भाऊ महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाला जाणूनबुजून वैयक्तिक आकसापोटी आंदोलनाची पत्र देऊन त्याच्या प्रसारमाध्यमांद्वारे सार्वजनिक जीवनात बदनामी करीत असल्याचा वगरे यांचा आरोप आहे. त्यामुळे माझे कुटुंब नैराश्यात गेले आहे. या नैराश्यातून मी व माझी पत्नी स्वाती हिने आमच्या दोन लहान मुलीसह जीवन यात्रा संपविण्याचा दृढनिश्चय केला आहे. मला व माझ्या कुटुंबीयांना प्रहार अपंग संघटनेचा पटवर्धन कुरोली येथील पदाधिकारी, त्याचा भाऊ आदींनी आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. माझा प्रवास शेवटाकडे चालू आहे. असे सुसाईड नोटमध्ये म्हणत गणेश वगरे, त्यांची पत्नी स्वाती वगरे, मुलगी रुची व प्राची वगरे गुरुवार सायंकाळ पासून बेपत्ता झाले आहेत.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT