Latest

Snake Bite : ‘मण्यार’ सापाचा दंश; ४ रुग्णालयात नेऊनही १२ वर्षीय साराला मृत्यूने गाठले

backup backup

पेण प्रतिनिधी; पुढारी वृत्तसेवा – Snake Bite : 'पेण तालुक्यातील जिते गावात १२ वर्षीय सारा रमेश ठाकूर हिला मण्यार जातीचा अत्यंत विषारी साप चावला. 'मण्यार' जातीचा साप चावल्यानंतर तिला त्वरीत एका पाठोपाठ चार रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. तरीही साराला वाचवण्यात यश आले नाही. तिच्या उपचारासाठी १२ तासाच्या धावपळीनंतर अखेर मृत्यूने तिला गाठले. मुलीच्या मृत्यूने पेण तालुक्यातील जिते गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, तिच्या मृत्यूमुळे सर्पदंशावरील औषधाची मात्रा अपुरी होती का उपचार कमी पडले, का योग्य औषध उपलब्ध नव्हते, अशा शंका नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

सारा रमेश ठाकूर ही मुलगी आपल्या घरात कुटुंबीयांसोबत झोपलेली होती. आज बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास मण्यार जातीचा विषारी सर्प घरात आला.  मण्यार हा अत्यंत विषारी सर्प मानला जातो. या विषारी मण्यार सापाने अंधारात झोपलेल्या साराला दोन वेळा चावले. (Snake Bite) साप चावल्याने ती झोपेतच ओरडली. त्यामुळे घरातील सर्वजण जागे झाले. तिच्या बाजूलाच सर्प ही दिसल्याने सर्पदंश केल्याची घरच्यांना जाणीव झाली. साराला त्वरित पेणच्या सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. तर गावातील जाणकार सर्पमित्र राजेश ठाकूर याने या विषारी मण्यार सर्पाला पकडून दवाखान्यातही दाखवण्यासाठी आणले.

यावेळी पेणच्या रुग्णालयात सारा हिला सर्पदंश प्रतिबंधक औषध (Snake Bite) देण्यात आले. तरीही साराची प्रकृती ढासळत असल्याने शेजारीच असणा-या महाजन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनाही दाखविण्यात आले. तेथेही उपचाराला साथ न देणा-या साराला अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात सकाळी नेण्यात आले.  मात्र, तेथेही तिच्यावर उपचारांचा फरक पडत नसल्याने तेथील डॉक्टरांनी सुद्धा तिला आणखीन पुढे कामोठे येथील रुग्णालयात पाठविले. तो पर्यंत दुपार झाली होती. मात्र येथेही तीने उपचारांना प्रतिसाद न दिल्याने तिचा बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान मृत्यू झाला. एकूणच पहाटे 2 ते दुपारी 2 पर्यंतच्या 12 तासात चार वेगवेगळया दवाखान्यात वेळीच नेऊनही 12 वर्षाची सारा हिचा मृत्यू झाला.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT